आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Aishwarya Rai Bachchan Wore To Lunch With The French President

ऐश्वर्याच्या बनारसी साडीला सोन्याचा मुलामा असलेली चांदीची जरी, लाखांमध्ये आहे किंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेड-पिंक कलरच्या बनारसी साडीतील ऐश्वर्याचा दिलखेचक अंदाज. - Divya Marathi
रेड-पिंक कलरच्या बनारसी साडीतील ऐश्वर्याचा दिलखेचक अंदाज.

एन्टरटेन्मेंट डेस्कः 67 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी निवडक लोकांसोबत लंचचा आस्वाद घेतला. या मान्यवरांच्या यादीत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या नावाचा समावेश होता. या कार्यक्रमात ऐश्वर्या रेड-पिंक कलरच्या सुंदर बनारसी साडीत अवतरली. यावेळी ऐश्वर्याने परिधान केलेल्या सुंदर साडीमुळे उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वाती आणि सुनैना यांनी ही खास बनारसी साडी ऐश्वर्यासाठी डिझाइन केली होती. ऐश्वर्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या या साडीची किंमत लाखांच्या घरात असून या साडीची खास वैशिष्ट्ये आहेत.
काय आहेत या साडीची वैशिष्ट्ये, हे आम्ही तुम्हाला खास या पॅकेजमधून सांगत आहोत.