आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya, Shilpa, Karisma, Twinkle Looked Radiant And Beaming Even During Pregnancy.

राणी, अर्पिताला लागली मातृत्वाची चाहुल, पाहा प्रेग्नेंसीच्या काळातील अभिनेत्रींचा स्टायलिश LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील उत्कृष्ट आणि अविस्मरणीय काळ असतो. हाच अनुभव सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा घेत आहेत. पुढील वर्षीही राणी मुखर्जी पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत.
बातम्यांनुसार, अभिनेत्री राणी मुखर्जीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पुढील महिन्यात असून तो पारंपरिक बंगाली पद्धतीने होणार आहे. राणी ट्रेडिशनल आहे. राणी-आदित्य चोप्राच्या मुंबईतील बंगल्यात हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर दुसरीकडे अर्पिताचेदेखील हे पहिले बाळ आहे. गेल्यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील बिझनेसमन आयुष शर्मासोबत अर्पिता विवाहबद्ध झाली. नुकताच लंडन येथे तिने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्पिताचे बेबी बंप दिसले.
प्रेग्नेंसीच्या काळातील राणी आणि अर्पिताची निवडकच छायाचित्रे समोर आली आहेत. मात्र बी टाऊनच्या इतर अभिनेत्रींविषयी बोलायचे झाल्यास जेनेलिया देशमुख, ऐश्वर्या राय बच्चन, करिश्मा कपूर, शिल्पा शेट्टी, ट्विंकल खन्ना, अमृता अरोरा या अभिनेत्रीसुद्धा प्रेग्नेंसीच्या काळात अनेकदा स्टायलिश आऊटफिट्समध्ये सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसल्या. काहींनी साडीत तर काहींनी शॉर्ट ड्रेसमध्ये याकाळात पब्लिक अपिअरन्स दिला होता. या सर्व अभिनेत्रींच्या चेह-यावर आई होण्याचा आनंद स्पष्ट दिसला. प्रेग्नेंसीच्या काळात लठ्ठ झालेल्या या सर्व अभिनेत्रींनी बाळाच्या जन्मानंतर काही काळातच स्वतःला फिट करुन आपले वाढलेले वजनदेखील कमी केले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला प्रेग्नेंसीच्या काळात या अभिनेत्री कशा दिसल्या हे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूड अभिनेत्रींची प्रेग्नेंसीच्या काळातील झलक...