आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Steals The Red Carpet In A Black Gown At HT Awards

PICS: ब्लॅक गाऊनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली ऐश्वर्या, सासरेबुवांनी सावरुन दिला ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अलीकडेच एका अवॉर्ड नाइटमध्ये क्लिक झालेली अभिषेक, ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांची छायाचित्रे)
मुंबईः गुरुवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधअये मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2015 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अमिताभ बच्चन मुलगा आणि सूनेसोबत सहभागी झाले होते. या सोहळ्यात अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन यांना मोस्ट स्टायलिश कपलच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माजी जगतसुंदरी आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर स्टायलिश अंदाजात अवतरली होती. तिने ब्लॅक कलरचा स्ट्रेप्लेस गाऊन परिधान केला होता. या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. मात्र रेड कार्पेटवर चालत असताना या ड्रेसमध्ये ती जरा अनकम्फर्टेबल दिसली. तिच्या पायात गाऊन सारखा अडखळत होता. त्यामुळे तिला चालताना जरा त्रास जाणवला. मात्र ऐश्वर्याला होणारा त्रास लगेचच तिच्या सासरेबुवांच्या अर्थात अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आला आणि त्यांनी तिचा ड्रेस तिला सावरुन देण्यात मदत केली. त्यामुळे ऐश्वर्या सहजपणे चालू शकली.
ऐश्वर्या लवकरच 'जज्बा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅकची तयारी करत आहे.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला रेड कार्पेटवर क्लिक झालेली ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांची खास छायाचित्रे दाखवत आहोत.