आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तर या अटीवर Ex Boyfriend सलमानबरोबर काम करायला तयार झाली ऐश!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय आणि सलमान खान. - Divya Marathi
ऐश्वर्या राय आणि सलमान खान.
मुंबई - ऐश्वर्या राय बच्चन तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानबरोबर काम करायला तयार आहे. मात्र त्यासाठी तिने एक अट ठेवली आहे. देशातील प्रसिद्ध पत्रकार राजीव मसंद यांनी त्यांच्या एका कॉलममध्ये हा दावा केला आहे. मसंद यांनी त्यांच्या कॉलममध्ये खुलासा केला आहे की, ऐश सलमानबाबतचा भूतकाळ विसरली आहे. त्यामुळे सलमानशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा तिला फारसा फरत पडत नाही.

ऐश्वर्याने ठेवलेली अट..
राजीव मसंद यांच्या कॉलमनुसार ऐश्वर्याने सलमानबरोबर चित्रपट साइन करण्याची तयारी दाखवली आहे. पण त्यासाठी तिने स्क्रीप्ट आणि डायरेक्टर एक्स्ट्राऑर्डिनरी असावे अशी अट ठेवली आहे.

1999 पासून 2002 पर्यंत होते अफेयर
ऐश्वर्या आणि सलमानने 'हम दिल दे चुके सनम'(1999) मध्ये सोबत काम केले होते. त्या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ते जवळ आले. पण 'हम तुम्हारे है सनम' (2002) रिलीज झाल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. या चित्रपटातही ऐश्वर्या सलमानची गर्लफ्रेंड होती. दोघांच्या ब्रेकअपचे कारण फार कमी लोकांना माहिती आहे. पण ऐश्वर्याने सलमानवर मारहाणीचा आरोप लावला होता. त्यानंतर तिचे नाव विवेक ओबेरॉयबरोबरही जोडले गेले. 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनबरोबर लग्न केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सलमान आणि ऐश्वर्या यांचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...