आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajay Devgan Starrer Son Of Sardaar 2 Coming On Diwali 2017

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2017 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार अजयचा 'सन ऑफ सरदार 2'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता अजय देवगणने त्याच्या 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार' या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचे ठरवले आहे. दोन वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये अजय 'सन ऑफ सरदार 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारेय. दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करण्याचा त्याचा मानस आहे.
2012 मध्ये रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमवला होता. अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा यांच्यासारख्या तगड्या स्टार कास्ट असलेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात भारतात 71.53 कोटींची कमाई केली होती. अभिनेता सलमान खानने अजयच्या मैत्रीखातर सिनेमात स्पेशल अपिअरन्ससुद्धा दिला होता. या सिनेमाची प्रस्तुती `वायकॉम 18 मोशन पिक्चर` आणि `इरोज इंटरनॅशनल` यांनी केली होती. तर सिनेमाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स आणि वायआरवी इंफ्रा अॅण्ड मीडिया (पी) लिमिटेड प्रोडक्शनची होती. अश्वनी धीरने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.
आता सिक्वेलमध्ये अजय देवगणसोबत तिच स्टारकास्ट असणार की नवीन कलाकारांची वर्णी सिनेमात लागणार हे तर अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिनेमाचा सिक्वेल आणण्यासाठी अजयने तब्बल पाच वर्षांचा कालावधी घेतला आहे. सो, अजयचे चाहते नक्कीच या सिनेमाची आतुरतेने वाट बघतील यात शंका नाही.