आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ajay Devgn Has Signed His This Year’s First Movie With Director Milan Luthria. The Movie Is Titled Badshaho

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बादशाहो : अजयसोबतचा सोनमचा पहिला चित्रपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक मिलन लुथरियाच्या 'बादशाहो' या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत सोनम कपूरचा समावेश असल्याचे समजते.
सोनमने आजपर्यंत अक्षय कुमार (‌थँक यू) आणि सलमान खान या सिनियर अॅक्टर्ससोबत (सांवरिया) काम केले आहे. सलमानसोबतचा 'प्रेम रतन धन पायो' हा तिच्या आतापर्यंतच्या करिअरमधील मोठा चित्रपट आहे. आता ती 'बादशाहो'मध्ये अजय देवगणसोबत दिसणार असल्याचे समजते. 'द डर्टी पिक्चर' आणि 'वन्स अपॉन टाइम इन मुंबई' चे दिग्दर्शक मिलन लु‌थरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. इमोशनल ड्रामाबरोबरच चित्रपटात फुल मसाला अॅक्शनचा समावेश असून हा चित्रपट मार्च २०१६ मध्ये रिलीज करण्याचे नियोजन आहे. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन करण्यात येत आहे.
चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून यामध्ये अजयचे शेड्यूल सुरुवातीला असणार आहे. तेव्हा सोनम 'प्रेम रतन..' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र राहील. सोनमने या चित्रपटाबाबत दुजोरा दिला नाही. तसे तर ती कोणत्याच चित्रपटाची स्वत:हून घोषणा करत नाही. एका चर्चेमध्ये तिने सांगितले की, 'मी काही गोष्टी गोपनीय ठेवण्यामध्ये वाकबगार आहे. चित्रपटाबाबतची अधिकृत घोषणा करण्याचा हक्क निर्माता-दिग्दर्शकांना असतो. त्यांच्या मर्जीनुसार ते सिनेताऱ्यांची घोषणा करू शकतात. काही वेळा चित्रपट साइन केला जातो; पण मतभेदांमुळे आपण जर चित्रपटापासून वेगळे झालो तर वेगळीच चर्चा रंगते. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतरच मी यावर उघडपणे चर्चा रंगते.
बातम्या आणखी आहेत...