Home »Gossip» Ajay Kumar The Shortest Actor Of The World

हा आहे जगातील सर्वात ठेंगणा अॅक्टर, यामुळे स्वतःपेक्षा दुप्पट उंचीच्या तरुणीसोबत थाटले लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 00:27 AM IST


मुंबई/हैदराबादः दाक्षिणात्य सिनेसृष्टी केवळ अॅक्शनपॅक्ड सिनेमांसाठीच नव्हे तर येथे काम करणा-या स्टार्सच्या नावी होणा-या वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी ओळखली जाते. आता गिनीज पकरु नावाने प्रसिद्ध असलेल्या मल्याळम अभिनेता अजय कुमार (अजय पकरु) चे उदाहरण घ्या. अजयच्या नावी जगातील सर्वात ठेंगण्या अभिनेत्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अजय कुमारची उंची केवळ 2 फूट 6 इंच एवढी आहे.

2005 साली स्वतःपेक्षा दुप्पट उंचीच्या तरुणीसोबत थाटले लग्न...
40 वर्षीय अजय पकरु विवाहित असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. 2005 साली गायत्री मोहनसोबत अजयचे लग्न झाले. गायत्री मोहनची उंची अजयपेक्षा दुप्पट आहे. अजयची उंची 2 फूट 6 इंच तर गायत्रीची उंची 5 फूट 1 इंच आहे. अजयने एका मुलाखतीत सांगितले होते, की होणारे बाळ त्याच्यासारखे ठेंगणे जन्माला येऊ नये, या भीतीपोटी उंच मुलीसोबतच लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. गायत्री अगदी सहज त्याच्यासोबत लग्नाला तयार झाल्याचे त्याने सांगितले. एका शेजा-याने अजयच्या आईची गायत्रीच्या कुटुंबीयांशी ओळख करुन दिली होती. या ओळखीतून गायत्री आणि अजयचे लग्न जमले. या दाम्पत्याला एक मुलगी असून 2009 साली तिचा जन्म झाला. अजय आणि गायत्री यांनी त्यांच्या मुलीचे नाव दीप्ता किर्ती असे ठेवले आहे. दीप्ताची उंची अगदी सामान्य मुलांप्रमाणे आहे.

सर्वात ठेंगण्या दिग्दर्शकाचा रेकॉर्डसुद्धा अजयच्या नावी...
अजयने 'Albhutha Dweep' या मल्याळम सिनेमात लीड रोल साकारला होता. हा सिनेमा नंतर तामिळमध्ये डब करण्यात आला होता. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर 2008 मध्ये अजयच्या नावी सर्वात ठेंगण्या अभिनेत्याचा रेकॉर्ड बनला. 2013 मध्ये त्याने जगातील सर्वात ठेंगण्या दिग्दर्शकाचा रेकॉर्डसुद्धा आपल्या नावी केला. Kutteem Kolum(2013) हा सिनेमा अजयने दिग्दर्शित केला होता. आपल्या फिल्मी करिअरमध्ये अजयने 50 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, अजय पकरुची खासगी आयुष्यातील छायाचित्रे...

Next Article

Recommended