आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आर्ची\'नंतर आता या ग्लॅमरस तरुणीसोबत रोमान्स करणारेय \'परशा\', जाणून घ्या तिच्याविषयी A to Z

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकाश ठोसर, महेश आणि मेधा मांजरेकरांसोबत दिसणारी ही तरुणी आहे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस संस्कृती बालगुडे - Divya Marathi
आकाश ठोसर, महेश आणि मेधा मांजरेकरांसोबत दिसणारी ही तरुणी आहे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस संस्कृती बालगुडे
मुंबई : वरील छायाचित्र बघून 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबत दिसणारी ही तरुणी आहे तरी कोण? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच डोकावला असेल ना. अनेकांनी ही मिस्ट्री गर्ल वाटली असेल. थांबा थांबा जास्त विचार करु नका. आम्ही तुम्हाला सांगतो ही तरुणी आहे तरी कोण?
आकाशसोबत दिसणारी ही तरुणी आहे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅक्ट्रेस संस्कृती बालगुडे आणि या दोघांचा हा लेटेस्ट फोटो आहे इटलीमधील. दोघेही सध्या इटलीत आहेत. याचे कारण म्हणजे हे दोघेही लवकरच दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या आगामी 'एफ यू' या सिनेमात झळकणारेय. सध्या या सिनेमाचे शूटिंग इटलीत सुरु आहे. शूटिंगच्या फावल्या वेळेत क्लिक झालेला दोघांचा हा फोटो संस्कृतीने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 'एफ यू' या आगामी सिनेमात आकाश आणि संस्कृतीसोबत महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर आणि अभिनेत्री माधुरी देसाई यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'सैराट' या सिनेमाने आकाशला एका रात्रीतून स्टारडम मिळाले आहे. तरुणींच्या गळ्यातील तर तो ताईतच बनला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी त्याच्यातील अभिनय कौशल्य हेरले आणि मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांच्या पंक्तीत आकाशची गणना होऊ लागली आहे. आता आकाशचा एफयू नावाचा हा दुसरा सिनेमासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने आकाश सध्या परदेशवारी करतोय.

या सिनेमाच्या निमित्ताने संस्कृतीलासुद्धा मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी संस्कृतीला प्रेक्षकांनी छोट्या पडद्यावर पाहिले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, आकाशच्या या हीरोईनविषयी सर्वकाही आणि सोबतच बघा संस्कृतीचा लक्ष वेधून घेणारा हॉट अंदाज... सोबतच बघायला विसरु नका आकाशसोबतचा तिचा खास व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...