आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रोपदी बोलतेय इंग्रजीत, नकुल-सहदेव \'गे\', अशी आहे \'महाभारत\'ची ही शॉर्ट फिल्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'देली बेली' सिनेमाचे डायरेक्टर अक्षत वर्मा यांची शॉर्ट फिल्म 'मम्माज बॉईज' वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. हिंदू महासभाने 'मम्माज बॉईज'विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. ही शॉर्ट फिल्म महाभारतावर आधारित आहे. महाभारत 2016 च्या स्टाईलमध्ये सादर करण्यात आले आहे.

द्रोपदीच्या भूमिकेत बॉलिवूड अॅक्ट्रेस अदिति राव हैदरी, तर कुंतीच्या भूमिकेत नीना गुप्ता दिसत आहे. शकुनी मामाच्या भूमिकेेत दिवंगत रझाक खान दिसत आहे. आतापर्यंत ही वादग्रस्त शॉर्ट फिल्म अडीच लाखांहून जास्त यूजर्सनी पाहिली आहे.

नकुल आणि सहदेवला दाखवले 'गे'.....
- मद्यनिर्माता कंपनी 'रॉयल स्टॅग' या कंपनीने या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. 'लार्ज शॉर्ट फिल्म्स कॅम्पेनच्या धर्तीवर ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे.
- 16 मिनिट 32 सेकंदाच्या फिल्ममध्ये द्रोपदीला मॉडर्न लुकमध्ये दाखवले आहे. तिच्या डोक्यावर मुकुट, आणि अंगावर आभुषणे आहेत. तसेच भीम (अरुणोदय सिंह) याला जिममध्ये वर्कआउट करताना दाखवले आहे.
- इतकेच नाही तर, नकुल आणि सहदेवला 'गे' दाखवले आहे. फिल्ममधील कलाकार इंग्लिशमध्ये संवाद साधताना दिसतात. याशिवाय काही कलाकारांना सिगारेट ओढताना दाखवले आहे.

अशी होते फिल्मची सुरुवात...
- फिल्मच्या सुरुवातीला कॅमेरा अर्जुन भोवती ‍फिरतो. तो किचनमध्ये कुंतीजवळ उभा असतो. तो द्रौपदीला जिंकून घरी आणतो. पण, कुंती म्हणते, हिला पाच भावांमध्ये वाटून घ्या.
- भीम (अरुणोदय सिंह) जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. त्याच्यासोबत हिडिम्बा आहे. हिडिंबाचा रोल टीना सिंह हिने केला आहे.

हिंदु संघटनांनी दिली प्रोड्यूसरला धमकी...
- 'हिंदु सेना'चे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी सांगितले की, 'मम्माज बॉईज'च्या माध्यमातून हिंदु धर्माती महाग्रंथ महाभारताची खिल्ली उडवली आहे. इतकेच नाही तर भारतीय संस्कृतीची बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे.
- फिल्म 'यूट्यूब'वरून तत्काळ हटवण्यात यावे, अन्यथा याचा परिणाम वाईट होईल, अशी धमकी विष्णु गुप्ता यांनी दिली आहे.
- 'मम्माज बॉईज'च्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश नाही. ही शॉर्टफिल्म मनोरंजन म्हणून पाहावी, असे आवाहन अक्षत वर्मा यांनी केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, वादग्रस्त 'मम्माज बॉईज' शॉर्ट फिल्म (शेवटच्या स्लाइडवर)आणि संबंधित फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...