आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Jacqueline Seductive Photoshoot For Vogue

अक्षय-सिद्धार्थसोबत जॅकलिनने केले SIZZLING PHOTOSHOOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोशूटमध्ये अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस)
मुंबईः बॉलिवूडमध्ये सहा वर्षांपूर्वी एन्ट्री घेणा-या श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसचा नवीन बोल्ड अवतार समोर आला आहे. व्होग मॅगझिनसाठी केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये जॅकलिनचा बिकिनी अवतार बघायला मिळतोय. तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमारसुद्धा या फोटोशूटमध्ये दिसतोय. मुंबईतील एका हॉटेलच्या पूलसाइडमध्ये झालेल्या या फोटोशूटमध्ये दोन्ही स्टार्सची केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. काही छायाचित्रांमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहरसुद्धा दिसतोय.
जॅकलिन आणि अक्षय कुमार स्टारर 'ब्रदर्स' हा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणारेय. या सिनेमाच्या रिलीजपूर्वी हे फोटोशूट समोर आले आहे. ब्रदर्समध्ये जॅकलिन आणि अक्षय पती-पत्नीच्या भूमिकेत असून तिचा डी-ग्लॅम लूकमध्ये यामध्ये पाहायला मिळणारेय.
खरं तर करिअरच्या सुरुवातीच्या काळात जॅकलिनने बोल्ड ड्रेसेस परिधान केले होते. मात्र पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड साजिद खानच्या नकारानंतर तिने बोल्ड फोटोशूट किंवा बोल्ड ड्रेसेस परिधान करणे बंद केले होते. आता मात्र ती सिंगल असून सर्व बंधने तोडून बोल्ड रुपात समोर आली आहे.
हे फोटोशूट 'ब्रदर्स'च्या प्रमोशनसाठी करण्यात आल्याचे समजते. करण मल्होत्रा दिग्दर्शित हा सिनेमा 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार असून करण जोहर याचा निर्माता आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचीसुद्धा या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लक्ष वेधून घेणा-या अक्षय, सिद्धार्थ, जॅकलिन आणि करण जोहरच्या फोटोशूटची ही खास झलक...