आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून वयाच्या 42व्या वर्षी सिंगल आहे अक्षय, जयललितांना डेट करायची होती इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः दिवंगत अभिनेते विनोद खन्ना आणि त्यांची पहिली पत्नी गीतांजली यांचा मुलगा अक्षय खन्ना 42 वर्षांचा झाला आहे. पण अद्याप तो सिंगल असून त्याने लग्न केलेले नाही. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा अक्षय अविवाहित का आहे, याचा खुलासा स्वतः त्याने एका मुलाखतीत केला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांना डेट करण्याचे स्वप्न अक्षयने पाहिले होते. या मुलाखतीत अक्षय त्याच्या आयुष्यातील अशा एका स्पेशल महिलेविषयी विचारणा झाली, जिला तो पार्टनर बनवू इच्छितो. यावर अक्षयने उत्तर दिले होते...  
- अक्षयने उत्तर देताना सांगितले होते, "खरंच अशी स्पेशल स्त्री आता माझ्या आयुष्यात नाही. या क्षणी मी आता भूतकाळसुद्धा आठवू इच्छित नाही. मला एकीची कंपनी पसंत होती. पण आता ते क्षण माझ्या आयुष्यातील कट ऑफ पॉईंट आहे. माझे ते नाते सुंदर, प्रेमळ आणि केअरिंग ठरु शकले असते. पण अखेर मी एकटाच राहिलो. आता हा एकांत मी सोडू शकत नाही. ही आता माझी जीवन जगण्याची पद्धत झाली आहे. याचा अर्थ मी कमिटमेंटला घाबरतो, असा नाही."

- अक्षयने या मुलाखतीत सांगितले  होते, की त्याचा लाजाळू स्वभाव आहे. जेव्हा त्याला एखाद्याचे अटेन्शन मिळतं, तेव्हा तो अनकम्फर्टेबल फिल करतो. तो म्हणतो, "मी सेल्फ कॉन्शिअस मुळीच नाही. पण पब्लिसिटी, फेम आणि अटेन्शन मला आवडत नाही. यामुळे मला आनंद मिळत नाही. एखादा पॉप स्टार लाखोच्या गर्दीसमोर स्टेजवर उभा राहून गाऊ शकतो, पण खासगी आयुष्यात तो रिझर्व असू शकतो. तसंच माझं आहे."

जयललिता यांना डेट करायची होती अक्षय खन्नाची इच्छा, वाचा पुढील स्लाईड्सवर...  
 
बातम्या आणखी आहेत...