आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अक्षयसोबत होते 90च्या दशकातील या फेमस अॅक्ट्रेसचे अफेअर, आज आहे बिजनेस वुमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता अक्षय कुमारला अलीकडेच 'रुस्तम' या सिनेमातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अक्षय वर्षाला एकाहून अधिक सिनेमे करण्यासाठी ओळखला जातो. अक्षय 90च्या दशकापासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. याकाळात त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत सूत जुळल्याच्या बातम्या चर्चेत राहिला. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे आयशा जुल्का.  लोकप्रिय अभिनेत्री आयशा जुल्काने करिअर शिखरावर असतानाच बॉलिवूडला अलविदा म्हटले. आयशाच्या सांगण्यानुसार, सिनेमे फ्लॉप होण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळेतच करिअर संपुष्टात आणले. आयशाने 2003 मध्ये बिझनेसमन समीर वाशीसोबत लग्न केले.  तिचे नाव अक्षय कुमारसोबत जुळले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयशा जुल्का अक्षयबाबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. परंतु अक्षयला त्यावेळी रिलेशनशिपमध्ये पडायचे नव्हते. त्यामुळे दोघे विभक्त झाले.
 
 
बिझनेस वुमन बनली आयशा...
आज आयशा एक सक्सेसफुल बिझनेस वुमन बनली आहे. तिचा पती समीर वाशी (2003) एक कन्स्ट्रक्शन टायकून आहे, त्याच्यासोबत आयशा कन्स्ट्रक्शन (SamRock), स्पा (Anantaa) आणि स्वत:चे क्लोदिंग लाइन (Additions) सारखे बिझनेस सांभाळत आहे.

अनेक हिट सिनेमांत केले काम...
आयशाने 90च्या दशकात 'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर', 'बलमा', 'रंग' आणि 'वक्त हमारा है' सह अनेक सिनेमांत काम केले. तिने आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि कमल हसनसारख्या सुपरस्टार्ससोबत रोमान्स केला.

वयाच्या 11व्या वर्षी केली करिअरला सुरुवात...
आयशाने वयाच्या 11व्या वर्षी 'कैसे कैसे लोग' (1983) सिनेमातून करिअरला सुरुवात केली. 2010 पर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणा-या आयशाने 27 वर्षांच्या करिअरदरम्यान जवळपास 52 सिनेमांत काम केले. मात्र, करिअरच्या पहिल्या सिनेमात काम केल्यानंतर तिने 7 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला.

पुढील स्लाईड्सवर वाचा आयशाच्या करिअर आणि खासगी आयुष्याशी निगडीत खास गोष्टी...  
बातम्या आणखी आहेत...