आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सौगंध' पासून 'टॉयलेट एक प्रेमकथा' पर्यंत, 26 वर्षात इतका बदलला अक्षयचा लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमारचा चित्रपट 'टॉयलेटः एक प्रेमकथा' आज (11 ऑगस्ट) रोजी रिलीज झाला आहे. सामाजिक मुद्द्यांवर बनलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. अक्षय कुमारने हिंदी चित्रपटांत 26 वर्षे पूर्ण केलेली आहेत. 1991 साली अक्षय कुमारने सौगंध या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. डेब्यूवेळी अगदी बारीक होता अक्षय कुमार..

अक्षय कुमारने 1991 साली 'सौगंध' चित्रपटाज्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यावेळी बारीक असलेल्या अक्षय कुमारचे मोठे केस होते. तेव्हा चित्रपटात मोठ्या केसांची फॅशन होती. पण जसाजसा काही काळ लोटला तेव्हा अक्षयच्या लुकमध्ये फरक जाणवू लागला. या 26 वर्षामध्ये अक्षय कुमार कधी छोट्या तर कधी मोठ्या केसांमध्ये दिसला. 
 
या चित्रपटात केले आहे अक्षयने काम..
26 वर्षाच्या फिल्मी करिअरमध्ये अक्षयने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्यात 'डांसर' (1991), 'मिस्टर बॉन्ड' (1992), 'खिलाड़ी' (1992), 'सैनिक' (1993), 'मोहरा' (1994), 'इक्के पे इक्का' (1994), 'सबसे बड़ा खिलाड़ी' (1996), 'तराजू' (1997), 'संघर्ष' (1999), 'हेराफेरी' (2000), 'अजनबी' (2001), 'आवारा पागल दीवाना' (2002), 'एतराज' (2004), 'वेलकम' (2007), 'हाउसफुल' (2010), 'बेबी' (2015), 'ब्रदर्स' (2015), 'नाम शबाना' (2017) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, अक्षय कुमारचे विविध लुक्स..
बातम्या आणखी आहेत...