Home »Gossip» Akshay Kumar Director Friend Sunil Darshan Revealed Facts

...तर या कारणामुळे अक्षय करत नाही प्रियांकासोबत काम, मित्राने केले खुलासे

दिव्य मराठी वेब टीम | Sep 09, 2017, 17:29 PM IST

मुंबई - अक्षय कुमार आणि फिल्ममेकर सुनील दर्शन या जोडीने बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक चित्रपट दिले. त्यात ‘जानवर’,‘एक रिश्ता’,‘हां मैंने भी प्यार किया’,‘मेरे जीवन साथी’ आणि ‘अंदाज’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. दोघांचा शेवटचा चित्रपट 2006 साली ‘मेरे जीवन साथी’हा होता. यानंतर दोघांनी कधीच सोबत काम केले नाही. अक्षयच्या 50 व्या वाढदिवसा निमित्त आमच्या प्रतिनीधींनी सुनील यांच्यासोबत खास बातचीत केली. प्रियांकाच्या चित्रपटांपासून दूर झाला अक्षय..

अंदाज (2003) आणि ऐतराज (2004) या चित्रपटांच्या यशानंतर प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार बॉलिवूडची हिट जोडी बनली. सोबतच त्यांच्या अफेअरच्याही बातम्या आल्या होत्या. ज्यामुळे अक्षय आणि ट्विंकल यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाले होते. यानंतर प्रियांकाच्या चित्रपटापासून अक्षय अचानक बाहेर पडला. सुनील यांनी सांगितले की, ‘बरसात’ (2005) चित्रपटासाठी अक्षय आणि प्रियांका यांच्यात काही वितुष्ट आलेले दिसत होते. त्यानंतर अक्षयकडे डेट्स नसून आता तो या चित्रपटाचा भाग असणार नाही असे सांगण्यात आले.
त्यानंतर बॉबीला घेऊन चित्रपट शूट करण्यात आला.
पुढच्या स्लाईडवर वाचा, अक्षयबाबतीत अजून काही खास गोष्टी...

Next Article

Recommended