आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयने तयार केले आहेत हे नियम कायदे, फिल्मच्या प्रमोशनसाठी देतो फक्त 10 दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक मोठे कलावंत आपापल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक ते दीड महिना वेळ देतात. मात्र, अक्षय कुमार फक्त दहा दिवसच देतो. चित्रपट साइन करतानाच तो करारावर याबाबत लिहून देतो. अक्षय कुमार वर्षांतून फक्त चारच चित्रपट करतो. त्यानंतर कुटुंबाला घेऊन बाहेर फिरायला जातो, असा करणारा अक्षय एकमेव अभिनेता आहे.
 
लंडनमध्ये शूटिंगसोबतच कुटुंबासोबत घालवतोय वेळ...
सध्या अक्षय कुमार लंडनमध्ये आहेत. 'गोल्ड' चित्रपटाच्या शूटिंग बरोबरच तो कुटुंबासोबतही वेळ घालवत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी तो भारतात परतणार आहे. त्यानंतर 11 ऑगस्टरला प्रदर्शित होणाऱ्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे.  सूत्रानुसार, अक्षय जेव्हा एखाद्या चित्रपटाशी करार करतो तेव्हा त्यात पैसा, अधिकारांबरोबरच वेळेविषयीदेखील नियम-अटी ठरवतो. त्याचे काटेकोर पालनही करतो. अक्षयने स्वत:चे काही नियम-कायदे तयार केले आहेत. 

पुढे वाचा, रविवारी शूटिंग करत नाही अक्षय, यासह आणखी काय आहेत त्याचे नियम कायदे... 
बातम्या आणखी आहेत...