आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा आई होणार आहे अक्षयची ऑन स्क्रिन बहीण, बेबी बंपसोबत केले फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'खट्टा मीठा' (2010) या चित्रपटात अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री उर्वशी शर्मा उर्फ रैना जोशी सध्या तिचा प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. उर्वशी दुस-यांदा आई होणार आहे. सध्या ती पती सचिन जोशी आणि तीन वर्षांची मुलगी समायरासोबत क्रोएशिया येथे बेबीमून साजरा करत आहे. अलीकडेच तिने प्रेग्नेंसी फोटोशूटसुद्धा केले आहे. विविध डिझायनर ड्रेसमध्ये उर्वशीने हे फोटोशूट केले असून यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. 

लग्नानंतर उर्वशीने बदलेले नाव...
- 2012 साली उर्वशीने सचिन जोशीसोबत लग्न केले. 
- या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी असून तिचे नाव समायरा आहे. 
- लग्नानंतर उर्वशीने नाव बदलून रैना जोशी असे ठेवले आहे.
- रैनाचे पती सचिन JMJ ग्रुपचे व्हाइज चेअरपर्सन असून त्यांची कंपनी गोवा ब्रॅण्डच्या तंबाखूची निर्मिती करते.
- तंबाखूच्या बिझनेससोबतच सचिन विकिंग मीडिया अँड एन्टरटेन्मेंट या प्रॉडक्शन कंपनीचे मालक आहे. 

या चित्रपटांमध्ये झळकली आहे रैना... 
- उर्वशी उर्फ रैनाने अब्बास मस्तान यांच्या नकाब (2007) या चित्रपटातून डेब्यू केले होते. या चित्रपटात अक्षय खन्ना  आणि बॉबी देओल लीड रोलमध्ये होते. 
- याशिवाय ती  'बाबर'(2009), 'खट्टा-मीठा'(2010), 'आक्रोश'(2010) आणि 'चक्राधार'(2012) या चित्रपटांमध्ये झळकली आहे. 
- उर्वशीने  'थ्री' (2008) या तेलुगु चित्रपटातही अभिनय केला. सोबतच ती 'अम्मा'(2016) या मालिकेतही झळकली आहे. 
- तर सचिन अजान, मुंबई मिरर आणि जॅकपॉट या चित्रपटांमध्ये झळकले आहेत.

किंगफिशर व्हिलाचे मालक आहे सचिन जोशी...
सचिन जोशींनी विजय माल्ल्याच्या मालकीचा गोव्यातील किंगफिशर व्हिल्ला (बंगला) मोठी रक्कम मोजून काही दिवसांपू्र्वीच खरेदी केला. तब्बल 73 कोटींची बोली सचिन यांनी या बंगल्यासाठी लावली होती.

पाहुयात, उर्वशीच्या प्रेग्नेंसी फोटोशूटसोबतच डोहाळे जेवणाचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...