आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारने वर्षाला दिले आहेत 12 सिनेमे, बघा Life चे निवडक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता अक्षय कुमारने वयाची 49 वर्षे पूर्ण केली आहेत 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसर (पंजाब) येथे जन्मलेल्या अक्षयने आपल्या करिअरची सुरुवात 1987 मध्ये रिलीज झालेल्या 'आज' या सिनेमाद्वारे केली होती. या सिनेमात अक्षयची भूमिका केवळ सात सेकंदांची होती. 'सौगंध' (1991) या सिनेमात पहिल्यांदा अक्षय लीड रोलमध्ये झळकला होता. मात्र दुर्दैवाने त्याचा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला होता. पडद्यावर त्याला खरी ओळख मिळवून दिली ती 'खिलाडी' (1992) या सिनेमाने. त्यानंतर अक्षयने कधीही मागे वळून पाहिले नाही.

1994 या वर्षभरात अक्षयचे एक दोन नव्हे तर तब्बल 12 सिनेमे रिलीज झाले होते. यामध्ये 'एलान', 'ये दिल्लगी', 'जय किशन', 'मोहरा', 'मैं खिलाडी तू अनाडी', 'इक्के पे इक्का', 'अमानत', 'सुहाग', 'नजर के सामने', 'जख्मी दिल', 'जालिम' आणि 'हम हैं बेमिशाल' या सिनेमांचा समावेश आहे. आजसुद्धा अक्षय वर्षाला किमान चार सिनेमे करत असतो. याचवर्षीच बघा ना, अक्षयचे तीन सिनेमे रिलीज झाले. 'एअरलिफ्ट', 'हाऊसफूल 3' आणि 'रुस्तम' हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. शिवाय वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर 'ढिशूम' या सिनेमात तो कॅमिओ करताना दिसला.
बालपणापासूनच खेळाची आणि नृत्याची आवड...
राजीव हरी ओम भाटिया अर्थातच अक्षय कुमारला बालपणापासूनच डान्सिंग आणि खेळाची विशेष आवड राहिली आहे. दिल्लीत सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर अक्षय मार्शल आर्ट्सचे धडे गिरवण्यासाठी बँकॉकला गेला होता. येथे अक्षयने शेफ आणि वेटरचेसुद्धा काम केले होते. काही दिवसांनी तो मुंबईत परतला आणि तरुणांना अॅक्शन शिकवू लागला. एका विद्यार्थ्यानेच अक्षयची छायाचित्रे काढून तुम्ही मॉडेल होऊ शकता, असा सल्ला दिला. त्यानेच अक्षयला मॉडेलिंगची पहिली असाइनमेंट मिळवून दिली होती. महिन्याला चार हजार रुपये कमावणा-या अक्षयला मॉडेलिंगसाठी दोन तासांचे पाच हजार रुपये मानधन मिळाले. हे बघून अक्षय अचंबित झाला. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा तासन्तास बसून राहिला होता राजेश खन्नांच्या ऑफिसमध्ये ...
ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा राजेश खन्ना जय शिव शंकर हा सिनेमा बनवत होते. अक्षय या सिनेमात रोल मागण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेला होता. राजेश खन्ना यांनी त्याला बरीच प्रतिक्षा करायला लावली. मात्र तरीसुद्धा त्याला ते भेटले नव्हते. अक्षयला त्यांना न भेटताच ऑफिसमधून परतावे लागले होते.

जेव्हा एका पंजाबी तरुणीने घातले लग्नासाठी साकडे...
एकदा पंजाबहून आलेली तरुणी अक्षयच्या घरासमोर उपोषणाला बसली होती. अक्षयने तिला घराच्या आत बोलावले. त्याला वाटले, फोटो काढेल, ऑटोग्राफ घेऊन ती तरुणी निघून जाईल. मात्र ती तरुणी त्याच्याकडे लग्नासाठी मागे लागली. तू माझा जुना बॉयफ्रेंड आहे, असे म्हणू लागली. अखेर अक्षयने तिच्या आईवडिलांना मुंबईत बोलावले आणि तरुणीला घरी पाठवले होते.

शिक्षिकेवर जडले होते अक्षयचे प्रेम...
शालेय जीवनात अक्षयचे त्याच्या शिक्षिकेवर प्रेम जडले होते. चुकीने त्याने ही गोष्ट त्याच्या मित्राला सांगितली होती. त्यानंतर शिक्षिकेला ही गोष्ट समजली. त्यावेळी शिक्षिकेच्या रागाला अक्षयला सामोरे जावे लागले होते.

अफेअर आणि लग्न...
अक्षयचे नाव रवीन टंडन, रेखा आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत जुळले होते. मात्र 14 जानेवारी 2001 रोजी अक्षयने राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांनी एक बातमी प्रकाशित झाली होती, अक्षय घर सोडून हॉटेलमध्ये राहतोय. ही बातमी खोटी ठरली आणि अक्षयने संबंधित वृत्तपत्राला कायदेशीर नोटिस बजावली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अक्षयचे निवडक Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...