आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar Twinkle Khanna Reveal Dimple Kapadia Considered Akki Gay Koffee With Karan

अक्षय कुमारला 'गे' समजायची त्याची सासू डिंपल, करणच्या शोमध्ये ट्विंकलने केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आज त्याचा 50 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. अक्षयने डिंपल कपाडीयाची मुलगी ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे.विशेष म्हणजे अक्षय कुमारला त्याची सासू डिंपल कापडिया गे समजत असे. या गोष्टीचा खुलासा ट्विंकल खन्नाने करण जोहरचा शो 'कॉफी विद करण' मध्ये केला होता. 2016 साली ट्विंकल आणि अक्षयला शोमध्ये इनवाईट केले होते त्यावेळई ट्विंकलने त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. या कारणाने अक्षय 'गे' असल्याची डिंपल यांना होती शंका...
 
शोमध्ये ट्विंकलने तिच्या लग्नाबद्दल सर्वात मोठा खुलासा केला की डिंपल कापडीया अक्षयला 'गे' समजत असे. डिंपल यांना त्यांच्या एका जर्नलिस्ट फ्रेंडने सांगितले की अक्षय 'गे' आहे. यानंतर डिंपल यांनी अक्षयची माहिती काढली. इतकेच नाही तर अक्षयचे जेनेटिक चेकही केले. 
शोमध्ये ट्विंकलने सांगितले की, अक्षयने लग्नासाठी प्रपोज केले त्यावेळी तिचा मेला हा चित्रपट रिलीज होणार होता. जर मेला फ्लॉप झाला तर लग्न करेल असे ट्विंकलने ठरवले होते. चित्रपट फ्लॉप झाल्यावर अक्षय ट्विंकलच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अक्षय-ट्विंकलच्या लग्नाबाबतीत काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...