आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday Spl: Akshay Loves To Spend Quality Time With Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरवर्षी 3-4 सिनेमे देणारा अक्षय, असा घालवतो फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- टि्ंवकल खन्ना, डिम्पल कपाडिया, नितारा खन्नासोबत अक्षय कुमार)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 9 सप्टेंबरला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. 1967मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेल्या अक्षय कुमारने बँकॉकच्या एका हॉटेलमध्ये शेफ ते बॉलिवूडचा सुपरस्टार असा प्रवास गाठला आहे. अक्षय बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांमध्ये सामील आहे, जे सिनेमांसोबत आपल्या कुटुंबीयांनासुध्दा व्यवस्थित वेळ देऊ शकतो. दरवर्षी अक्कीचे 3-4 सिनेमे रिलीज होतात. या वर्षी त्याचे 'बेबी', 'गब्बर इज बॅक' आणि 'ब्रदर्स' रिलीज झाले. ऑक्टोबरमध्ये त्याला 'सिंह इज ब्लिंग' रिलीज होणार आहे.
आकड्यांवर एक नजर टाकली तर ज्या गतीने अक्षयचे सिनेमे फ्लोरवर येतात, त्यावरून अंदाजा लावला जाऊ शकतो, की तो बी-टाऊनमधील सर्वात बिझी व्यक्ती आहे. सिनेमांशिवाय ब्रँड एन्डोर्समेंटच्या शूटिंगमध्येसुध्दा तो बिझी असतो. मात्र इतका बिझी असूनसुध्दा तो आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम घालवतो. बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तो पत्नी टि्ंवकल, मुलगा आरव आणि मुलगी निताराला कधी शॉपिंग तर कधी आऊटिंगवर घऊन जातो.
टि्ंवकलसाठी नेहमी फ्री-
अक्षय-टि्ंवकलच्या लग्नाला जवळपास 15 वर्षे उलटून गेले आहेत, परंतु आजसुध्दा अक्की टि्ंवकलसाठी नेहमी वेळ काढतो. अवॉर्ड फंक्शनपासून पार्ट्यापर्यंत, अक्षय-टि्ंवकलची जोडी क्वालिटी टाइम घालवताना दिसते. आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत अक्षय सुट्या घालवण्यासुध्दा विसरत नाही. काही दिवसांपूर्वी दोघांनी एका मासिकासाठी फोटोशूट केले होते, त्यामध्ये या कपलची रोमँटिक केमिस्ट्री दिसली होती. अलीकडेच टि्ंवकलच्या 'मिसेस फनीबोन्स' बुक लाँचिंगवेळी अक्षय-टि्ंवकलला पूर्ण सपोर्ट करताना दिसला.
मुलगा आरवला देतो क्वालिटी टाइम-
आरव आता 12 वर्षांचा झाला आहे. अक्षयलासुध्दा माहित आहे, एक वडील म्हणून मुलाला माझी किती गरज आहे. तो आरवसोबत एका मित्राप्रमाणे वागणूक करतो. तो अनेकदा आरवसोबत सिनेमे पाहण्यासाठी जातो. अक्षय स्वत:सुध्दा स्पोर्ट्सचा शौकीन आहे आणि आरवलासुध्दा नेहमी स्पोर्ट्सशी जोडण्यासाठी प्रोत्साहित करतो. वेळ मिळाल्यानंतर दोघे व्हॉलिबॉल खेळतात.
अक्षयची लाडकी आहे नितारा-
अक्षय कुमारची जवळपास तीन वर्षांची मुलगी नितारा त्याची लाडकी आहे. अक्षय मुलगी निताराला कुशीत घेऊन जातान अनेकदा दिसला आहे. मागील दिवसांत मकर संक्रातीवेळी अक्षयने एक खास फोटो सोशल साइट्सवर शेअर केला होता. या फोटोमध्ये तो मुलगी नितारासोबत पतंगबाजीचा आनंद घेताना दिसला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अक्षय कसा फॅमिलीसोबत वेळ घालवतो...