आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियाला मिळाले नव्हते टॉयलेट, घ्यावा लागला होता रस्त्याच्या कडेचा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'उडता पंजाब' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा अवॉर्ड आपल्या नावी करणा-या अभिनेत्री आलिया भटने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत आलियाने उघड केली, की दिग्दर्शक इम्तियाज अलींच्या 'हायवे' सिनेमाच्या शुटिंगच्या काळात टॉयलेट उपलब्ध न झाल्याने तिच्यावर रस्त्याच्या कडेला लघवी करण्याची वेळ आली होती. या सिनेमाचे शूटिंग विविध ठिकाणी झाले होते. अनेक सीन्स हे आम्हाला हायवेवर चित्रीत करावे लागले होते, असे आलियाने सांगितले. 

व्हॅनिटी व्हॅन नव्हती सोबत... 
- आलियाने या मुलाखतीत सांगितले, की एकदा आम्ही हायवेवर ट्रकने प्रवास करत होते, तेव्हा अचानक वाटेत आम्हाला एक सुंदर लोकेशन दिसले. तेथे शूटिंगसाठी लागणारा सूर्यप्रकाश चांगला होता, त्यामुळे काही सीन्स तेथेच चित्रीत करण्याचा तत्काळ निर्णय घेतला.  
- पण शूटिंगच्या काळात तेथे टॉयलेट नव्हते आणि माझी व्हॅनिटी व्हॅनदेखील सोबत नव्हती. त्यामुळे नाइलाजाने मला रस्त्याच्या कडेला लघुशंका करावी लागली होती. 

पुढे वाचा, 'हाईवे'नंतर पुसली गेली आलियाची स्टारकिड इमेज... 
बातम्या आणखी आहेत...