Home »Gossip» Alia Bhatt Multi Coloured Sequined Midi Skirt Worth Rs 4000

कमी किंमतीचा स्कर्ट घालून अंबानींच्या पार्टीत पोहोचली आलिया, एवढी होती किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 12:44 PM IST

बॉलिवूड स्टार्स कायम डिझायनर आणि महागड्या ड्रेसेसमध्ये वावरताना दिसत असतात. फक्त बॉलिवूड स्टार्सच नव्हे तर त्यांची मुलेदेखील महागडे कपडे वपारतात. पण अलीकडेच अंबानींच्या पार्टीत सहभागी झालेली अभिनेत्री आलिया भट हिच्याबाबतीत मात्र काही वेगळे घडले. अंबानींनी होस्ट केलेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अनेक जण डिझायनर ड्रेसेसमध्ये दिसले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आलिया भट या पार्टीत अवघ्या चार हजार रुपये किंमतीच्या स्कर्ट आणि टँक टॉपमध्ये पोहोचली. आलियाने परिधान केलेला स्कर्ट मल्टी कलर होता. या लेगकट स्कर्टसोबत आलियाने ब्लॅक कलरचा टँक टॉप घातला होता.

खरं तर आलियाचे कपडेसुद्धा अतिशय महागडे असतात. ती इव्हेंट्स आणि पेज थ्री पार्टीजमध्ये अतिशय ग्लॅमरस लूक आणि डिझायनर ड्रेसेसमध्ये दिसते. पण या पार्टीत ती अतिशय सिंपल लूकमध्ये दिसली.


आलियाच्या चित्रपटांविषयी बोलायचे तर 'राजी' हा तिचा आगामी चित्रपट असून तो 2018 मध्ये रिलीज होणार आहे. 5 वर्षांच्या करिअरमध्ये आलियाने 'स्टूडंट ऑफ द इयर' (2012), 'हायवे' (2014), 'हम्टी शर्मा की दुल्हनियां' (2014), 'शानदार' (2015), 'उडता पंजाब' (2016) सह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका वठवल्या आहेत.


पाहुयात, अंबानींच्या पार्टीत क्लिक झालेली आलियाची आणखी काही छायाचित्रे...

Next Article

Recommended