आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alleged Secret Emails Of Kangana To Hrithik Are Out

वाचा हृतिकला पाठवलेल्या वादग्रस्त E-Mails मध्ये कंगनाने काय-काय लिहिले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कंगना ईमेल हॅकिंग वादामध्ये दोघांकडूनही परस्पर विरोधी वक्तव्ये सुरु झाली आहेत. हृतिकने पोलिसांकडे पुरावे म्हणून सादर केलेल्या ईमेल्सवर कंगनाने आपल्या वकिलांच्या माध्यमातून हल्ला केला आहे. या दोघांमधील वाद यावर्षीचा चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठा वाद आहे. ही केस सध्या न्यायालयात आहे. नुकत्याच समोर आलेल्या ई-मेलच्या आधारे हृतिकची बाजू स्पष्ट होते. सध्या या दोघांच्या नात्यात एक नवीन नाटकीय वळण आले आहे. हृतिक रोशन समजून कंगना कुणातरी दुसऱ्याच व्यक्तीला ई-मेल पाठवत होती. इंग्रजी दैनिक डीएनए जवळ कंगनाने पाठवलेले काही मेल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कंगना एकतर्फी त्याच्या प्रेमात होती का? हा प्रश्नही आता पडू लागला आहे.
हृतिक रोशनने कंगनाविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यात म्हटले होते की, कंगना माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी मेल पाठवत होती. बदनामी मात्र माझी झाली. त्यानंतर हृतिकने आपला ओरिजनल मेल आयडीही पोलिसांना दिला. या बदलेल्या आयडीवरही कंगनाने नंतर मेल पाठवल्याचे त्याचे म्हणणे होते. आता कंगनाने हृतिकला पाठवलेले काही मेल समोर आल्याने, तो निर्दोष असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या प्रकरणातील एका तपासी पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, 'हृतिकच्या मेलचा फोरॅन्सिक लॅबचा रिपोर्ट आला आहे. त्याते कंगणाने पाठविलेले सुरवातीचे मेल दुसऱ्या कुणाला तरी जात होते, हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या मेलची संख्या 3000 च्या घरात आहे.' ही बाब गंभीर आहे. पोलिस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करत आहे.
लीक झालेल्या ई-मेल्समध्ये कंगनाने हृतिकला काय-काय लिहिले होते, वाचा पुढील स्लाईड्सवर...