आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलु अर्जुनच्या हीरोईनला करायचे आहे लव्ह मॅरेज, 5 वर्षे होती सिनेसृष्टीपासून दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अनू इमैनुएल लवकरच पवन कल्याणसोबत 'पवन कल्याण 25' आणि अलु अर्जुनसोबत आगामी 'ना पेरू सूर्या' या सिनेमात झळकणार आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अनूने लव्ह मॅरेज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनू म्हणाली, लग्नापूर्वी जर तुमचे तुमच्या पार्टनरवर प्रेम असेल, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्यारितीने समजू शकता. म्हणून मी लव्ह मॅरेज करायचे ठरवले आहे. अद्याप स्वप्नातील राजकुमार गवसला नसून त्याच्या शोधात असल्याचेही तिने सांगितले. 

अनूने 2011 साली आलेल्या 'स्वप्न संचारी' या मल्याळम सिनेमातून अभिनयाचा श्रीगणेशा केला. हा सिनेमा अनूचे वडील थंकाचन इमैनुएल यांनी प्रोड्युस केला होता.

लव्ह मॅरेजविषयी आणखी काय म्हणाली अनू...
- अनू म्हणाली, सध्या मी कुणाच्याही प्रेमात पडलेले नाही. पण लव्ह मॅरेज करण्याचा निर्णय नक्की झाला आहे.
- अनूने पुढे सांगितले, की सध्या ती कामात एवढी बिझी आहे, की तिच्याकडे कुणासाठीच वेळ नाहीये.  
 
डेब्यू फिल्मनंतर शिक्षणासाठी पाच वर्षांचा घेतला होता ब्रेक... 
- 2011 साली 'स्वप्न संचारी' या मल्याळम सिनेमातून डेब्यू केल्यानंतर अनूने पाच वर्षांचा सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता.
- त्याचे कारण म्हणजे डेब्यू सिनेमाच्या वेळी अनू नववीत शिकत होती. या सिनेमात तिने बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.
- त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने सिनेमे स्वीकारले नाहीत. पाच वर्षे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनूने 2016 साली 'अॅक्शन हीरो बिजू' या मल्याळम सिनेमातून रुपेरी पडद्यावर पुन्हा एन्ट्री घेतली. या सिनेमात निविन पॉली हा तिचा हीरो होता. 
 
शिकागोत झाला अनूचा जन्म...
अनूचा जन्म शिकागो (अमेरिका) येथे झाला. येथेच तिचे शिक्षण झाले. अनूचे वडील निर्माते आणि बिझनेसमन आहेत. तिला एक भाऊ असून एलेन एमैनुएल हे त्याचे नाव आहे.
 
या सिनेमांत झळकली आहे अनू...
अनू आतापर्यंत सहा सिनेमांत काम केले आहे. 'स्वप्न संचारी' (2011), अॅक्शन हीरो बिजू (2016), मजनूं (2016), ऑक्सीजन (2016), किट्टू उन्नाडू जगरथा  (2016) हे तिचे प्रमुख सिनेमे आहेत. 

हे आहेत अनूचे आगामी सिनेमे...
थुप्परिवालान (2017), पवन कल्याण 25 (2017) आणि ना पेरू सूर्या (2018) या आगामी सिनेमांत अनू झळकणार आहे.

पुढे बघा, दाक्षिणात्य अभिनेत्री अनू इमैनुएलचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...