आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ameesha Patel, Tabu And Many More Actresses Ar Still Single

प्रीती-उर्मिलाचे झाले लग्न, पस्तीशी-चाळीशी ओलांडलेल्या या 11 अॅक्ट्रेसेस आहेत Unmarried

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री प्रीती झिंटानंतर आता उर्मिला मातोंडकरनेही गुरुवारी काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर यांच्‍यासोबत लग्न केले आहे. मोहसीन तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. तर, 29 फेब्रुवारीला प्रीती झिंटाने लॉस एंजिलिसमध्ये 10 वर्षांनी लहान असलेला अमेरिकन बॉयफ्रेंड जीन गुडइनफ याच्‍यासोबत लग्न केले. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर या दोन्ही अभिनेत्रींनी लग्नाचा निर्णय घेतला. प्रीती 41 तर उर्मिला 42 वर्षांची आहे. विशेष म्हणजे या दोघींचेही नवरे त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान आहेत.

प्रीती आणि उर्मिलाने आपल्या लग्नसोहळ्यांबाबत अत्यंत गुप्तता बाळगली होती. या दोघांनी आपल्या आयुष्याचा जोडीदार गवसला आहे, मात्र बी टाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची पस्तीशी, चाळीशी ओलांडूनदेखील अद्याप लग्नाचा निर्णय घेतलेला नाहीये.
बिपाशा बसू
बंगाली गर्ल बिपाशा बासु आणि जॉन अब्राहम यांचे अफेअर माध्यमांमध्ये बरेच गाजले होते. त्यानंतर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघाचे अफेअर तुटले. आता ती अभिनेता हरमन बवेजासोबतच्या अफेरअने चर्चेत आहे. 37 वर्षांची झालेल्या बिपाशाचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमचे प्रिया रुंचालसोबत लग्न झाले. सध्या बिपाशा टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता करणसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.
सुष्मिता सेन
सुष्मिता सेन भारताकडून मिस यूनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली मॉडेल आहे. तिने 'बीवी नं. 1', 'क्योकी मै झूठ नही बोलता', 'आंखे' आणि 'दुल्हा मिल गया'सारख्या दमदार सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. परंतु ख-या आयुष्यात तिला अद्याप तिचा जोडीदार मिळालेला नाहीये. 40 वर्षांची झालेली सुष्मिता, माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम आणि उद्योगपती अनिल अंबानीसारख्या दिग्गजांसोबतच्या अफेअरमुळे ती नेहमीच चर्चत राहिली आहे.
कोण आहेत वयाची पस्तीशी आणि चाळीशी ओलांडलेल्या अविवाहित अभिनेत्री जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...