आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 ऑगस्टला मृत्यूच्या दारातून परत आले होते बिग बी, चाहते साजरा करताय \'B\'day\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2 ऑगस्ट बॉलिवूडचा इतिसाहातील अशी तारिख आहे जी अमिताभ बच्चन यांच्या पुनर्जन्मसाठी ओळखली जाते. याच दिवशी 'कुली' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीरित्या जखमी झालेल्या अमिताभ यांना शस्त्रक्रियेने वाचवले होते.
आम्ही सांगतोय, 1982मधील त्या घटनेविषयी, ज्यामध्ये अमिताभ बच्चन मृत्यूच्या दारात गेले होते. 26 जुलै 1982मध्ये बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' सिनेमाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना सिनेमासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला. मात्र तरीदेखील ते शूटिंग करत राहिले. त्याच्या पुढील सीनमध्ये बिग बींना टेबलवर उडी मरायची होती, परंतु त्यांनी उडी मारताच टेबलचा एक कोपरा त्यांच्या पोटात लागला आणि रक्तस्त्राव सुरु झाला. ताबडतोब त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर लोकांमध्ये त्यांच्या निधनाची अफवा पसरली. 8 दिवस ते मृत्यूच्या दारात होते. 2 ऑगस्ट रोजी डॉक्टर्सनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले.
या दिवसाला अमिताभ मानतात पुनर्जन्म-
2 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन आपला पुनर्जन्मच्या रुपात आठवतात. त्यांनी टि्वटरवर लिहिले आहे, 'माझे हे टि्वट त्या सर्वांसाठी आहे, ज्यांनी माझ्यासाठी प्राथर्न केली. 2...ऑगस्ट म्हणजे माझा पुनर्जन्म झाला होता. मी हातू जोडून सर्वांचे आभार व्यक्त करतो.' (T 1948 - To all that give me prayers and wish .. Aug 2nd my rebirth in sense .. I fold my hands in gratitude and ..).
चाहतेसुध्दा देताय शुभेच्छा-
अमिताभ बच्चन यांचे चाहतेसुध्दा 2 ऑगस्ट हा दिवस बिग बींच्या दुस-या जन्माच्या रुपात साजरा करतात. टि्वटरवर त्यांना शुभेच्छा देतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चाहत्यांचे शुभेच्छाचे काही टि्वट्स...