आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan And Hrithik Roshan May Be Seen In Dhoom 4

'धूम' सीरिजच्या चौथ्या सिनेमात असतील हृतिक आणि अमिताभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशराज फिल्म्सची 'धूम' ही मोठी फ्रँचाइज आहे. यापूर्वीच्या धूमच्या तीन्ही सीरिजमध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा झळकले. तर जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान व्हिलनच्या भूमिकेत झळकले.
आता दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी धूमच्या चौथ्या भागावर काम सुरु केले आहे. यामध्ये बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी कुणीही नसणार असल्याचे स्पष्ट झाले असून अभिनेता हृतिक रोशनला खलनायकाची भूमिका ऑफर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हृतिकने ही ऑफर स्वीकारल्यास तो पुन्हा एकदा व्हिलनच्या भूमिकेत झळकेल. विशेष म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन पहिल्यांदाच धूम सीरिजमध्ये झळकण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास, अभिषेक आणि अमिताभ ही पिता-पुत्राची जोडी एका सिनेमात प्रेक्षकांना दिसेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''आदित्य चोप्रा आणि विजय कृष्ण आचार्य यांनी या सिनेमासाठी अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्याशी संपर्क साधला असून दोघांनाही सिनेमासाठी साइन केले आहे.''