Home »Gossip» Amitabh Bachchan Birthday Special Pics After Coolie Accident

B'day : कुलीच्या अपघातातून वाचणे हा पुनर्जन्म समजतात बिग बी, पाहा Rare Pics

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:39 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. पण बिग बींच्या जीवनात आणखी एक दिवस असा आहे ज्या दिवसाला ते वाढदिवस समजतात. तो म्हणजे 26 जुलै. हा दिवस म्हणजे कुलीच्या सेटवर झालेल्या अपघाताचा दिवस. या अपघातातून बचावणे म्हणजे पुनर्जन्म झाला असे बिग बी मानतात.
बिग बी गेल्या अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 'सात हिंदुस्थानी' चित्रपटापासून 1969 मध्ये सुरू झालेला बिग बींचा प्रवास आजही सुरुच आहे. पण 1982 च्या दरम्यान एक काळ असा आला होता, जेव्हा बिग बींना आता परत कधीही पडद्यावर पाहता येणार नाही अशी भिती निर्माण झाली होती. ती घटना म्हणजे 'कुली' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुर्घटनेत बिग बींच्या पोटाच्या अंतर्गत भागात झालेली जखम. त्यामुळे सुमारे आठवडाभर बिग बी रुग्णालयात दाखल होते. बिग बींसाठी त्यावेळी चाहत्यांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले होते. इंदिरा गांधीही त्यावेळी तातडीने दौरा आटोपून बिग बींना भेटायला पोहोचल्या होत्या. अनेक सेलिब्रिटींची तेव्हा रुग्णालयाबाहेर गर्दी असायची.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अमिताभ बच्चन यांचे या घटनेनंतरचे काही PHOTOS..
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended