Home »Gossip» Amitabh Bachchan Birthday Special Story

अमिताभबाबत पसरल्या या अफवा, जाणून घ्या काय होते, त्यामागचे सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 15:43 PM IST

वाराणसी - अमिताभ बच्चन आज 75 वर्षांचे झाले आहेत. त्यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांच्याबाबत पसरलेल्या अफवा आणि त्या मागचे नेमके सत्य काय होते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2006 मध्ये अभि‍षेक-ऐश्वर्याच्या लग्नापूर्वी अमिताभ संपूर्ण कुटुंबासह काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आले होते. त्याबाबतही अनेकत चर्चा होत असतात.

धार्मिक पर्यटनाला निघाले होते बच्चन कुटुंब
- काशी विश्वनाथ मंदिराचे अर्चक (पुजारी) श्रीकांत मिश्रा यांच्या मते, अभि‍षेक-ऐश्वर्याच्या लग्नाच्या आधी बच्चन कुटुंबीय धार्मिक पर्यटनासाठी बनारसला आले होते. पण मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की, ऐश्वर्याला मंगळ आहे आणि त्याचा दोष निवारण करण्यासाठी बच्चन कुटुंब याठिकाणी आले आहे. मंगळ असल्याने दोघांचे लग्ना होणार की नाही, असे लोक विचारायला लागले होते. पण बच्च कुटुंब तर फक्त धार्मिक पर्यटनासाठी आले होते.

नंतर झाले लग्न..
- ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. 20 एप्रिल 2007 ला त्यांचे लग्न झाले होते. लग्न बच्चन कुटुंबीयांचा बंगला 'प्रतीक्षा' मध्ये झाले तर रिसेप्शन ताज हॉटेलमध्ये झाले होते.
- लग्नाच्यावेळी ऐश्वर्या 33 वर्षांची होती तर अभिषेकचे वय 31 वर्षे होते. त्यांना दोघांना 5 वर्षांची एक मुलगी अराध्यादेखिल आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अमिताभबाबतच्या अफवा आणि Facts..

Next Article

Recommended