Home »Gossip» Amitabh Bachchan Fitness Secrets And Some Facts Of Life

वयाच्या 75 व्या वर्षी स्वतःला असे फिट ठेवतात अमिताभ बच्चन, जाणून घ्या त्यांचे सीक्रेट्स

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 15:31 PM IST

  • अमिताभ बच्चन
मुंबईः अमिताभ बच्चन यांनी आज वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातही ते पंचविशीतील तरुणांना मात देतात. जेव्हा ते स्वतः 25 वर्षांचे होते, तेव्हा 8 ते 10 तास झोपायचे. पण आता ते फक्त पाच तासांची झोप घेतात. याविषयी ते म्हणतात, जेव्हा गरज असते, तेव्हा मी झोप घेतो. वयाच्या या टप्प्यावरसुद्धा अमिताभ बच्चन यांनी स्वतःला कसे फिट ठेवले आहे, जाणून घेऊयात, या खास पॅकेजमध्ये...
वर्कआउट सीक्रेट्स...
- एक्सरसाइविषयी अमिताभ अतिशय शिस्तबद्ध आहेत. जर काही कारणास्तव सकाळी त्यांना व्यायामाला वेळ मिळाला नाही, तर संध्याकाळी न चुकता जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. फिटनेस ट्रेनर आणि डाएटिशियन वृंदा मेहता यांच्या मार्गदर्शनात बिग बी नियमित वर्कआउट करतात.
- कार्डियो सोबतच ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगाची मदत घेतात.

- ते संतुलित डाएट घेतात. बिग बी शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांनी त्यांच्या कुकिंग स्टाफला देशातील विविध राज्यांतील स्पेशल रेसिपी बनवण्याचे आदेश दिले आहेत. उदाहरणार्थ त्यांच्या घरचे कुक कधी भेंडीची भाजी बंगाली पद्धतीने तर कधी त्याला साऊ इंडियन टेस्टमध्ये बनवतात. याशिवाय बच्चन साहेबांचा मेन्यू नवीन आणि इंट्रेस्टिंग बनवण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर असते.

- 70 च्या दशकात अमिताभ दारु आणि सिगारेट ओढायचे. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः ही गोष्ट स्वीकारली होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की जेव्हा ते कोलकाता येथे नोकरीला होते, तेव्हा दिवसभरात ते 100 सिगारेट ओढायचे. पण मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी हे व्यसन सोडले. याशिवाय दारु, कॉफी आणि चहापासून ते दूर झाले आहेत.

- कधी जलेबी आणि खीरचे शौकिन असलेले बच्चन आता गोड पदार्थांपासून दूर राहतात. इतकेच नाही तर ते केक आणि पेस्ट्रीदेखील खात नाहीत. म्हणजेच "कुछ मीठा हो जाए...' म्हणणारे बच्चन साखरेपासूनच लांबच असतात. गोडाला पर्याय म्हणून ते शहद वापरतात. एकदा त्यांच्या सूनबाई ऐश्वर्याने याचा खुलासा करताना सांगितले होते, की बच्चन कुटुंबातील प्रत्येक सदस्य फिट राहण्यासाठी दररोज सकाळी एक चम्मच शहद खातात.
पुढे वाचा, अमिताभ बच्चन यांच्याविषयीच्या आणखी काही खास गोष्टी...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended