आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan, Govinda Worked Most Double Role In Bollywood

बॉलिवूडमध्ये कोण आहे सर्वाधिक दुहेरी भूमिका साकारणारा सुपरस्टार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये सध्या डबल रोल अर्थातच दुहेरी भूमिकांनी जोर धरला आहे. 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'मध्ये कंगना राणावत दिसणार आहे, तसेच 'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमानदेखील दुहेरी भूमिका साकारत आहे. तसेच 'फॅन' सिनेमात शाहरुखचे दोन पात्र दिसणार आहेत. मधल्या काळात एकानंतर एक अनेक अशा प्रकारचे सिनेमे फ्लॉप झाले होते. तरीदेखील याचा ट्रेंड कायम आहे.
अशा सिनेमांवर निर्माता-दिग्दर्शकांचा विश्वास आजसुध्दा आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडमध्ये कोणते असे स्टार्स आहेत, ज्यांनी दुहेरी भूमिका असलेले सर्वाधिक सिनेमे केलेत? कदाचित नाही. दुहेरी भूमिका साकारण्यामध्ये सर्वात पुढे महानायक अमिताभ बच्चन पुढे आहेत. हिंदी सिनेसृष्टीत अमिताभ यांनी आतापर्यंत 11 पेक्षा जास्त सिनेमांत एकाचवेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त भूमिका साकारल्या आहेत.
बिग बीनंतर अभिनेता गोविंदाचा यात नंबर लागतो. गोविंदानेसुध्दा 10 पेक्षा जास्त सिनेमांत दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. 'हद कर दी आपने' सिनेमात गोविंदाने एकाचवेळी 6 भूमिका साकारल्या होत्या. शिवाय बॉलिवूडचा खिलाजी अक्षय कुमारने 7, शाहरुख खानने 7 आणि सलमान खानने 4 सिनेमांत दुहेरी भूमिका वठवल्या आहेत. सोबतच दिलीप कुमार, संजीव कुमार, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, अजय देवगण, हृतिक रोशनसह अनेक स्टार्सनेसुध्दा सिनेमांत दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.

अनेक सिनेमा ठरले फ्लॉप-
अलीकडेच रिलीज झालेल्या 'एक पहेली लीला' सिनेमात सनी लिओनने दुहेरी भूमिका केली होती. हा सिनेमा फ्लॉप ठरला. यापूर्वी अक्षय कुमारचा 'खिलाडी 786', बिपाशा बसुचा 'अलोन' आणि सैफ अली खानचा 'हमशक्ल', 'हॅपी एंडिंग'सारखे दुहेरी भूमिका असलेले सिनेमांना नाकारले होते. या सर्व सिनेमांमध्ये आमिर खानचा 'धूम 3' आणि हृतिक रोशनचा 'क्रिश 3' यांनी मात्र दुहेरी भूमिकेत बाजी मारून नवीन विक्रम रचला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दुहेरी भूमिका असलेल्या स्टार्सच्या सिनेमांविषयी...