आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी भाड्याच्या घरात राहत होते अमिताभ बच्चन, आज आहेत 5 बंगल्यांचे मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलाहाबादमधील या बंगल्यातील एक चतुर्थांथ हिस्स्यात राहत होते बीग बी - Divya Marathi
इलाहाबादमधील या बंगल्यातील एक चतुर्थांथ हिस्स्यात राहत होते बीग बी
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन हे कधीकाळी भाड्याच्या घरात राहत होते हे कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. नुकतेच अमिताभ यांनी त्यांच्या जुन्या आठवणी इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. या फोटोंद्वारे त्यांनी सांगितले आहे की इलाहाबाद मध्ये राहत असताना ते त्यांच्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहत होते. इंस्टाग्रामवरील शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही या बंगल्याच्या एक चतुर्थांश हिस्स्यात भाडेकरु म्हणून राहत होते. आज 5 बंगल्याचे मालक आहेत बीग बी..
 
आज जलसा, प्रतिक्षा, जनक यांसारख्या अन्य २ बंगल्याचे मालक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भाड्याच्या घराचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी त्यावेळी लिहीले की,  We once stayed in 1/4th portion of this house on rent , our home in Allahabad.. 17, Clive Road .. I'm the 1950's. ..now visiting it in 1984 in the next pictures .. I do not know how to combine pictures in one frame for Instagram'.
 
त्यांनी अभिषेकच्या जन्मानंतरचा फोटोही शेअर केला आहे. त्यावेळी त्यांनी लिहीले की, 'That is Abhishek a few minutes after birth .. and then before you know it he becomes a strapping 6’3″ lad .. kids I tell you ..” the 74-year-old actor wrote'.
 
यासोबतच बीग बी यांनी अभिषेकसोबत एक फोटो शेअर केला आहे त्याला कॅप्शन दिले आहे, 'I once , not so long ago showed him the workings of technology .. now he teaches me .. Kids, I tell you..'.
 
हे आहेत बीग बींचे बंगले..
 सध्या अमिताभ बच्चन जलसा बंगल्यात कुटुंबासोबत राहत आहेत. दोन मजली असलेले हे घर 10 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. त्यांचा दुसरा बंगला आहे प्रतिक्षा जेथे ते जलसाच्या अगोदर राहत होते. प्रतिक्षा बंगल्यातच अभिषेक आणि श्वेताचे लहानपण गेले आहे. तर जनक बंगल्यात अमिताभ यांचे ऑफिस आहे. येथे ते मीडीया आणि त्यांच्या खास मीटींग ठेवतात. याशिवाय त्यांचे एक घर आहे जे त्यांनी एका मल्टीनॅशनल बँकेला भाड्याने दिले आहे. या बंगल्याचा मागील हिस्सा ते पार्टी इतर गेट टुगेदरसाठी वापरतात. अमिताभ यांनी जलसा बंगल्याच्या मागील एक बंगला खरेदी केला आहे जेथे त्यांनी आराध्याला खेळण्यासाठी एक गार्डन आणि एक मोठे लिवींग रुम बनविले आहे. जलसा मधून या बंगल्याला जाण्यासाठी एक रस्ता बनविला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमिताभ यांनी शेअर केलेले त्यांच्या बंगल्याचे फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...