आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: एकेकाळी महमूद यांनी दिली होती राहायला जागा, आज मुंबईत आहेत बिग बींचे 5 बंगले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: 'प्रतीक्षा' घराच्या गार्डनमध्ये वर्तमानपत्र वाचताना बिग बी - Divya Marathi
फाइल फोटो: 'प्रतीक्षा' घराच्या गार्डनमध्ये वर्तमानपत्र वाचताना बिग बी

मुंबई- बॉलिवूड अभिनेते अनिताभ बच्चन लवकरच वयाची 74 वर्षे पूर्ण करणार आहेत. 11 ऑक्टोबर 1942 मध्ये अलाहाबादमध्ये जन्मलेले अमिताभ मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात विनोदवीर आणि निर्माते महमूद यांच्या घरी राहत होते. त्याकाळी अमिताभ यांच्याकडे राहण्यासाठी ठिकाण नव्हते. परंतु आज त्यांच्याकडे प्रतिक्षा, जलसासह 4 आलिशान बंगले आहेत. त्यातील 'जनक'चा वापर कार्यालय म्हणून केला जातो. आता 'जलसा'मध्ये वास्तव्याला आहेत बिग बी...

- बिग बी यांचा मुंबईच्या जुहू परिसरात भव्यदिव्य बंगला आहे. सध्या अमिताभ बच्चन आपल्या कुटुंबीयांसोबत 'जलसा'मध्ये राहतात. दोन मजल्याचे हे घर जवळपास 10 हजार चौरस फूटात आहे.
- त्यांचा दुसरा बंगला 'प्रतिक्षा' आहे. 'जलसा'मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी ते 'प्रतिक्षा'मध्ये राहत होते. अनेक वर्षे अमिताभ आपल्या आई-वडिलांसोबत याच बंगल्यात राहिले. अभिषेक आणि श्वेताचे बालपणसुध्दा येथेच गेले.
- तसेच 'जनक'मध्ये अमिताभ बच्चन यांचे कार्यलय आहे. येथे ते माध्यमांना आणि नातेवाईकांना भेटतात. 70च्या दशकाच्या अखेरीस अमिताभ 'प्रतिक्षा'मध्ये शिफ्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी 'जलसा' खरेदी केला होता.
- याशिवाय बिग बींचे आणखी एक घर आहे. हे घर अमिताभ यांनी मल्टीनॅशनल बँकेला भाड्याने दिले आहे. यातील काही भाग बच्चन कुटुंबीय पार्ट्यांसाठी वापरतात.

आराध्यासाठी खरेदी केले नवीन घर
2014 मध्ये बिग बींनी 'जलसा'च्या मागे आणखी एक बंगला 60 कोटींमध्ये खरेदी केला आहे. तिथे आराध्याला खेळण्यासाठी गार्डन आणि मोठी लिविंग रुम आहे.

कम्फर्ट आहे प्राथमिकता
बिग बींसाठी पहिली प्राथमिकता कम्फर्ट आहे. मग ते घराविषयी असो अथवा कपड्यांविषयी. त्यांच्या घरातील फरशी इटॅलिअन मार्बलची आहे. तसेच बाथरुम फिटिंग्स फ्रान्स आणि जर्मनीहून मागवल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिग बींच्या घरांची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...