Home »Gossip» Amitabh Bachchan Play Double Role In These Films, Amitabh Bachchan Birthday Special

Birthday Special : या 10 चित्रपटात बॉलिवूडच्या महानायकाने साकारला होता डबल रोल

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 13:14 PM IST

अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. अनेक सुपरहिट चित्रपट दिणा-या बिग बींनी काही चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बींच्या याच चित्रपटांविषयीची खास माहिती देतोय.
'डॉन'मध्ये डबल रोलमध्ये झळकले होते अमिताभ बच्चन...
डायरेक्टर चंद्र बरोट यांच्या 1978 साली रिलीज झालेल्या 'डॉन' या चित्रपटात बिग बींनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. यापैकी त्यांनी साकालेली एक भूमिका ही डॉन तर एक सामान्य व्यक्तीची होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत झीनत अमान आणि प्राण लीड रोलमध्ये होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
'लाल बादशाह'मध्ये डबल रोलमध्ये होते अमिताभ बच्चन
केसी बोकाडिया दिग्दर्शित 'लाल बादशाह'मध्ये अमिताभ बच्चन डबल रोलमध्ये होते. बाप-मुलाची व्यक्तिरेखा त्यांनी या चित्रपटात साकारली होती. चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि मनीषा कोइराला लीड रोलमध्ये होत्या.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या चित्रपटांत अमिताभ बच्चन झळकले होते दुहेरी भूमिकेत...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended