आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan To Akshay Kumar International Film Festival Of India Closing Ceremony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षयने पाया पडताच ओशाळले अमिताभ, म्हणाले... 'तू असे करायला नव्हते पाहिजे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाची समाप्ती मंगळवारी झाली. गोव्यात झालेल्या या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ ईयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अक्षय कुमार आणि स्मृती इराणी यांनी दिला.

 

हा पुरस्कार अमिताभ यांना देण्याआधी अक्षय त्यांच्यासाठी बोलला, तो म्हणाला, "तसे मी नेहमी बोलण्याचे टाळतो, पण आज अमिताभ बच्चन यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ इयर' चा पुरस्कार दिला जात आहे. सर, आम्ही नेहमी तुमच्याकडून शिकत आलो आहोत. तुमच्याकडून मी वक्तशीरपणा शिकलो, अॅक्टिंगचे अजूनही बाकी आहे, प्रयत्न करतोय. सर (अमिताभ) तुम्हाला माहीत नाही की मी तुमची प्रत्येक शिकवण आत्मसात करतो. तुम्ही सांगितल्यामुळे मी 10 वेळा गुजरातला जाऊन आलो आहे, कारण तुम्ही नेहमी सांगता, आओ म्हारो गुजरात मां. खूप कमी लोकांना माहीत असेल की त्यांच्यावर (अमिताभ बच्चन) एक सुपर कॉमिक पुस्तक पण निघाले आहे. त्या कॉमिक पुस्तकाचे नाव आहे 'सुप्रीमो'. मी ते वाचले होते, आजपण मला त्यातील संवाद लक्षात आहेत, जहां सुपरहीरो खड़ा हो जाता है वहीं से लाइन शुरू होती है... जसे अमेरिकेत सुपरमॅन आहे, बॅटमॅन आहे आणि स्पायडर मॅन आहे. तसे आमच्याकडे भारतामध्ये अॅंग्री यंग मॅन आहे.' 

 

अक्षय पुढे म्हणाला..., 'तर मी आज ऑफिशियली सांगतो, की तुम्ही आपल्या इंडस्ट्रीमध्ये वडिलांसारखे आहात. आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकले आहे. जर तुम्ही परवानगी दिली तर इंडस्ट्रीच्या वतीने मी तुमच्या पाया पडू इच्छित आहे.' 

 

यावेळी अक्षयने स्टेजवरून खाली उडी मारली आणि अमिताभ यांच्या पाया पडला. अक्षय कुमार बिग बींच्या पाया पडतानाचे फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले. अमिताभ यांनीही अक्षयला गळ्याला लावले. अनेक नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारची प्रशंसा करत त्याला दाद दिली. पण, त्यानंतर बिग बींनी मात्र एक अनपेक्षित ट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले. 

 

या फोटोबद्दल अमिताभ बच्चन यांनी लिहिले आहे... 
एका ट्विटर युजरचे ट्विट रिट्विट करत बिग बींनी लिहिले, ‘अक्षय जे केलंस ते योग्य नाही, मी त्यावेळी संकोचलो होतो.’ त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी अक्षयची प्रशंसाच केली, असे म्हणायला हरकत नाही.


पुढील स्लाईड्सवर बघा, इफ्फीतील अक्षयचा भाषणाचा व्हिडिओ, बिग बींचे ट्वीट आणि सोहळ्यातील खास क्षणचित्रे...   

बातम्या आणखी आहेत...