आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी मुलगा अभिषेकडून घेतले 50 Cr चे कर्ज, सून ऐश्वर्याचेसुद्धा आहेत कर्जदार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबादः हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा व्हिडिओ तयार करून इंटरनेटवर अपलोड केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांना कॉपिराइट अॅक्टची आठवण करून दिली. दुसरीकडे अमिताभ यांच्या लीगल टीमने कुमार विश्वास यांना नोटीस पाठवून कविता गाऊन तुम्ही किती पैसे कमावले याची माहिती देण्यास सांगितले आहे. कुमार यांनीही रिट्विट करत याची माहिती दिली. कुमार यांनी बुधवारी (12 जुलै) अमिताभ यांना रिट्विट करत लिहिले, यासाठी केवळ लोकांची वाहवा मिळाली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, बाबूजींना श्रद्धांजली देण्यासाठी तयार केलेला व्हिडीओ डिलीट करत आहे आणि त्यातून कमावलेले 32 रुपये मी तुम्हाला पाठवत आहे. divyamarathi.com वाचकांना बिग बींच्या फायनॅन्शिअल प्रोफाइलशी निगडीत फॅक्ट्स सांगत आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे तब्बल 2800 कोटींची मालमत्ता असून त्यांच्या जया बच्चन 500 कोटींच्या संपत्तीच्या मालकिण आहेत. कोट्यवधींची संपत्ती असूनदेखील अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. त्यांनी कुणाकुणाकडून घेतलंय कर्ज, जाणून घेऊयात... 
 
बिग बींनी मुलाकडून घेतले आहे 50 कोटींचे कर्ज 
- जया बच्चन यांनी 2014 साली जाहीर केलेल्या राज्यसभा एफिडेविटनुसार, अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनकडून 50 कोटींचे कर्ज घेतले आहे.
- इतकेच नाही तर स्वतः जया बच्चन यांनीसुद्धा अभिषेक बच्चनकडून 1.6 कोटींचे कर्ज घेतले आहे.
- अमिताभ यांनी त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनकडून 21.4 कोटींची कर्ज घेतल्याचे या एफिडेविटमध्ये सांगितले गेले आहे.
- एफिडेविटनुसार, जया यांच्यावर 48 कोटींचे तर अमिताभ बच्चन यांच्यावर 104 कोटींचे कर्ज आहे.

(नोट - हे सर्व आकडे जया बच्चन यांनी 2014 साली सबमिट केलेल्या राज्यसभा एफिडेविटवर आधारित आहेत.)
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, अमिताभ-जया यांना किती कोटींचे आहे देणे आणि त्यांनी कुणा-कुणाला दिले उधार पैसे... 
बातम्या आणखी आहेत...