Home »Gossip» Amitabh Bachchan Took Loan From Bahu Aishwarya Rai Bachchan

बिग बींनी मुलगा अभिषेकडून घेतले 50 Cr चे कर्ज, सून ऐश्वर्याचेसुद्धा आहेत कर्जदार!

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 15:07 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातही बिग बी इंडस्ट्रीत अॅक्टिव असून लवकरच ते ठग्स ऑफ हिंदूस्थान या चित्रपटात झळकणार आहेत. या वयातील त्यांची एनर्जी तरुणांना लाजवणारी आहे. गेल्या 45 वर्षांच्या अधिकच्या करिअरमध्ये बिग बींनी मेहनतीच्या बळावर यशोशिखर गाठले. ते आज तब्बल 2800 कोटींहून अधिकच्या संपत्तीचे मालक आहेत. आज खास त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com वाचकांना त्यांच्या फायनॅन्शिअल प्रोफाइलशी निगडीत फॅक्ट्स सांगत आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडे तब्बल 2800 कोटींची मालमत्ता असून त्यांच्या जया बच्चन 500 कोटींच्या संपत्तीच्या मालकिण आहेत. कोट्यवधींची संपत्ती असूनदेखील अमिताभ आणि जया बच्चन यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. त्यांनी कुणाकुणाकडून घेतलंय कर्ज, जाणून घेऊयात...
बिग बींनी मुलाकडून घेतले आहे 50 कोटींचे कर्ज
- जया बच्चन यांनी 2014 साली जाहीर केलेल्या राज्यसभा एफिडेविटनुसार, अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनकडून 50 कोटींचे कर्ज घेतले आहे.
- इतकेच नाही तर स्वतः जया बच्चन यांनीसुद्धा अभिषेक बच्चनकडून 1.6 कोटींचे कर्ज घेतले आहे.
- अमिताभ यांनी त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनकडून 21.4 कोटींची कर्ज घेतल्याचे या एफिडेविटमध्ये सांगितले गेले आहे.
- एफिडेविटनुसार, जया यांच्यावर 48 कोटींचे तर अमिताभ बच्चन यांच्यावर 104 कोटींचे कर्ज आहे.
(नोट - हे सर्व आकडे जया बच्चन यांनी 2014 साली सबमिट केलेल्या राज्यसभा एफिडेविटवर आधारित आहेत.)

पुढील स्लाईड्सवर वाचा, अमिताभ-जया यांना किती कोटींचे आहे देणे आणि त्यांनी कुणा-कुणाला दिले उधार पैसे...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended