आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amul's Humorous Take On Aamir's 'intolerance' Remark

आमिरच्या #intolerance मुद्द्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाले ‘ऑल इज हेल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः असहिष्णुतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यामुळे बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर टीकेची झोड उठली आहे. त्याला अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मात्र या विरोधात काही लोक त्याला पाठिंबासुद्धा देताना दिसत आहेत. अमूल कंपनीने या मुद्द्यावर एक नवीन जाहिरात तयार केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
‘ऑल इज हेल’ की ‘ऑल इज वेल’
या जाहिरातीत अमूलची प्रसिद्ध मुलगी आमिर आणि त्याची पत्नी किरण रावसोबत बातचित करताना दिसत आहे. शिवाय आमिरच्या गाजलेल्या 'थ्री इडियट्स' या सिनेमातील 'ऑल इज वेल' या गाण्याचा वापर करुन ती त्यांना विचारतेय ‘ऑल इज हेल’ की ‘ऑल इज वेल’.
‘खा pk जाना’
याशिवाय आमिरवर आधारित एक जुनी जाहिरातसुद्धा व्हायरल झाली आहे. ही जाहिरात त्याच्या 'पीके' या सिनेमाच्या रिलीजवेळी समोर आली होती. 'पीके'च्या न्यूड पात्रावर ही आधारित होती. या अॅडमध्ये अमूलची मुलगी आमिरला ‘खा pk जाना’ म्हणून अलविदा करत आहे.
अमूलने यापूर्वीसुद्धा अनेक चर्चित मुद्द्यांवर अशा गमतीशीर जाहिराती रिलीज केल्या आहेत. या जाहिरातींना अनेक वृत्तपत्रांमध्ये स्थान मिळाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अमूलच्या सध्या व्हायरल होत असलेल्या जाहिराती...