मुंबई- आमिर खान आणि
सलमान खान अभिनीत 'अंदाज अपना अपना'ने 21 वर्षे पूर्ण केले आहेत. 11 एप्रिल 1994 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाच
सलमान खान आणि आमिर खान एकमेकांचे शत्रुच्या रुपात दिसले. मात्र रिअल लाइफमध्ये दोघांची मैत्री सिनेमातील शत्रुत्वापेक्षा आधिक आहे.
बातम्यांनुसार, या सिनेमासाठी आमिर आणि सलमान दोघांनी
आपआपल्यासाठी जास्तित जास्त फुटेज मागितले होते. परंतु नंतर दोघांना समान फुटेज मिळतील यावर ते राजी झाले. अंदाज अपना अपनापासून सुरु झालेल्या आमिर आणि सलमानच्या मैत्रीचा प्रवास आजही तशाच सुरु आहे. या मैत्रीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, ते दोघे एकमेकांना कधीच कमी लेखत नाहीत. त्यांच्यात कोण मोठा स्टार आहे, हा इगो कधीच दिसून आला नाही.
दोघांच्या मैत्रीची झलक आपण अनेकदा पाहतो. मैत्रीसाठी कधी-कधी आपल्या शोमध्ये
सलमान खान आमिरचे सिनेमे प्रमोट करताना दिसतो, तर कधी आमिर मित्राला भेटण्यासाठी सिनेमाच्या सेटवर जातो. असेच अनेक क्षण कॅमे-यातही कैद झाले आहेत.
divyamarathi.com तुम्हाला आज अनेक वर्षांपासून असलेल्या या घट्ट मैत्रीची एक झलक दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिर आणि सलमानची निखळ मैत्री...