आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतसोबत झळकणार ही मराठमोळी अॅक्ट्रेस, मुळची आहे नाशिकची, वाचा हिच्याविषयी A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार रजनीकांत यांच्या नवीन सिनेमाची घोषणा झाली आहे. रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुषने त्याच्या ट्विटर अकाउंटवर नवीन सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. 'काला करिकालन' हे त्यांच्या नवीन सिनेमाचे नाव असून या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री अंजली पाटील हिला त्यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. 28 मे पासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होतेय. 
 
सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलाकारानांच मिळते. राधिका आपटेनंतर आता ही संधी अंजली पाटीलला मिळाली आहे. स्वतः अंजलीने ट्विट करुन रजनीकांतसोबत काम करत असल्याची खुशखबर तिच्या चाहत्यांना दिली आहे. अंजलीने ट्विट केले, “Next film for this year. With THE ONE AND ONLY. Thalaiva. Produced by @dhanushkraja, Directed by @beemji..#Rajnikanth #Superstar #Kaala (sic).”
 
कोण आहे अंजली, यापूर्वी ती कोणकोणत्या सिनेमांमध्ये झळकली, याविषयीची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून देतोय...
बातम्या आणखी आहेत...