आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन घटस्फोट, तीन लग्नं आणि चार मुले... असे आहे एकेकाळी चहा विकणा-या अन्नू कपूरचे आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध अभिनेते, प्रेझेंटर आणि गायक अन्नू कपूर बॉलिवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी लीड रोल न साकारतादेखील इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. सिनेमा हिट असो वा फ्लॉप, अन्नू कपूर यांची भूमिका दमदार असते. सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी अनेक गाजलेले टीव्ही शोज होस्ट केले आहेत. अन्नू कपूर यांचा 'सुहाना सफर' हा शो अतिशय लोकप्रिय आहे. या शोमध्ये ते फिल्मी दुनियेतील अनेक पडद्यामागच्या गोष्टी सिनेरसिकांना सांगतात. अनेक कलाकारांच्या खासगी आयुष्याचे किस्से सांगणा-या अन्नू कपूर यांच्याविषयी मात्र क्वचितच तुम्हाला ठाऊक असावे. आज आम्ही तुम्हाला सांगतोय, अन्नू कपूर यांच्या खासगी आयुष्याविषयी. अन्नू कपूर यांनी आपल्या खासगी आयुष्यात तीनदा लग्न थाटले.  

पंजाबी कुटुंबात जन्म... 
अन्नू कपूर यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांची आई बंगाली होती. अन्नू कपूर यांचे वडील पारसी थिएटर कंपनी चालवत होते. शहरातील गल्लीबोळात त्यांची थिएटर कंपनी परफॉर्म करत होती. त्यामुळे अन्नू यांच्या कुटुंबीयांना नौटंकीवाला म्हटले जात होते. अन्नू यांची आई क्लासिकल डान्सर होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अन्नू यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते.  त्यांची आई कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी चाळीस रुपये पगारावर एका शाळेत शिकवायच्या अन्नू यांची आयएएस ऑफिसर होण्याची इच्छा होती. मात्र शिक्षण अर्धवट सुटल्याने त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले.  

पुढे वाचा, उदरनिर्वाहासाठी अन्नू कपूर यांनी लावला होता चहा स्टॉल... 
बातम्या आणखी आहेत...