(फाइल फोटो- अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर (इनसेनमध्ये अंशुलाने गोंदलेले टॅटू)
शनिवारी (11 एप्रिल) वर्ल्ड सिबलिंग डे निमित्त अर्जुन कपूरला एक खास गिफ्ट मिळाले आहे. त्याची बहीण अंशुला कपूरने
आपल्या भाऊच्या नावाचे टॅटू गोंदवून घेतले आहे. यामध्ये एक बाण आहे आणि त्यामध्ये अर्जुनचे नाव लिहिलेले आहे.
टॅटूचा एक फोटो अंशुलाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आणि लिहिले, 'घरे तेच जिथे आश्रय असतो. हॅप्पी सिबलिंग डे. आयुष्यातील अनेक चढ-उतारांतून मला सांभाळले आणि हिम्मत दिली. मला प्रत्येक संकाटातून वाचवले. तू जिथे आहे, तिथे मी सुरक्षित आहे.'
सोशल साइट्सवर राहते अॅक्टीव्ह-
अंशुला कपूर सोशल साइट्सवर नेहमी अॅक्टीव्ह असते. ती सतत तिचे आणि भाऊ अर्जुन कपूरचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये बालपणीपासून ते आतापर्यंतची अनेक क्षण ती सांगते. अर्जुन आणि अंशुला निर्माते बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचे मुले आहेत. श्रीदेवीसोबत लग्न करण्यासाठी बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट दिला होता. मार्च 2012मध्ये मोना यांचे निधन झाले. तेव्हापासून अंशुलाला सांभाळण्याची जबाबदारी अर्जुनच्या खांद्यावर आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंशुलाने सोशल साइट्सवर शेअर केलेले तिचे आणि त्याचे फोटो...