आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षे छोट्या गर्लफ्रेंडबरोबर इंटिमेट होताना दिसला हा डायरेक्टर, पोस्ट केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुरागने त्याचा आणि शुभ्राचा हा फोटो शेयर केला आहे. - Divya Marathi
अनुरागने त्याचा आणि शुभ्राचा हा फोटो शेयर केला आहे.
मुंबई - डायरेक्टर अनुराग कश्यप आणि शुभ्रा शेट्टी यांच्या अफेयरच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. दोघांचे काही फोटो समोर आले असून त्यापैकी एका फोटोत अनुराग आणि शुभ्रा इंटिमेट होत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर शुभ्राच्या हातात एक रिकामी बाटलीही आहे. यापूर्वी जुलै, 2016 मध्ये दोघांचा एक फोटो समोर आला होता. त्यात अनुराग शुभ्राला Kiss करताना दिसला होता. त्यावेळी हा फोटो शुभ्राच्या एका फ्रेंडच्या अकाऊंटवरून (gillianbolt) शेयर करण्यात आली होती. 

अनुरागपेक्षा 21 वर्षांनी लहान आहे शुभ्रा.. 
- शुभ्रा शेट्टी आणि अनुराग कश्यप यांच्या वयात 21 वर्षांचे अंतर आहे. एकिकडे अनुराग 44 वर्षांचा आहे तर शुभ्राचे वय केवळ 23 वर्षे आहे. 
- रिपोर्ट्सनुसार शुभ्रा मीडिया स्टुडंट आहे. 2014 मधये मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती अनुरागची प्रोडक्शन कंपनी फँटम फिल्म्समध्ये काम करत आहे. 
 
डिसेंबर 2015 मध्ये झाली अफेयरची चर्चा 
डिसेंबर 2015 मध्ये अनुराग आणि शुभ्रा यांच्या अफेयरच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. अनुराग आणि शुभ्रा अनेक इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. डिझायनर मसाबाच्या संगीत सेरेमनीतही शुभ्रा उपस्थित होती. स्वतः अनुरागने तिचा एक फोटो शेयर करत लिहिले होते, 'Hottie at the wedding'. या फोटोत तिने शुभ्राला टॅग केले होते. त्यामुळे मीडियात चर्चा सुरू झाली होती. दोघांच्या अफेयरबरोबरच ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याचीही चर्चा होती. 
 
अनुराग झाला होता नाराज 
शुभ्राबरोबर अफेयरच्या बातम्यांनी अनुरागने नाराजी व्यक्त केली होती. दुसऱ्या एका मित्राबरोबरचा पार्टीतील फोटो शेयर करत त्यांने हे वृत्त फेटाळले होते. फक्त त्याचा आणि शुभ्राचा फोटो दाखवून मीडियाने बातमी केल्याचे तो म्हणाला होता. त्याला खरे काय असे विचारले तेव्हा तो म्हणाला होता, फोटो सर्वकाही सांगत आहे, मला काहीही बोलायची गरज नाही. 

पुढील स्लाइड्सवर, शुभ्रा शेट्टी आणि अनुराग कश्यपचे इतर काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...