आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅचिंग ड्रेसमध्ये लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले अनुष्का-विराट, PHOTOS व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. - Divya Marathi
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
लंडन: विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघे लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, दोघांनी मॅचिंग ड्रेस परिधान केला आहे. फरक केवळ जॅकेटचा आहे. अनुष्काने क्रिम कलरचे जॅकेट घातले असून विराट ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे. अनुष्का लवकरच इम्तियाज अलीच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी यूरोपला जाऊ शकते. या सिनेमात तिच्या अपोझिट शाहरुख खान दिसणार आहे.
अनुष्काचे दोन सिनेमे रिलीजसाठी सज्ज...
जुलैमध्ये सलमान खानसोबत अनुष्का शर्माचा 'सुल्तान' सिनेमा रिलीज झाला. तिचे आणखी दोन सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहेत. त्यातील 'फिल्लौरी' हा तिच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा असून दुसरा करण जोहरचा 'ऐ दिल हौ मुश्किल' आहे. विराटविषयी सांगायचे झाले तर सध्या तो वेस्ट इंडिजच्या विरोधात टेस्ट सीरिजमध्ये बिझी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्का आणि विराटचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...