Home »Gossip» Anushka Sharma And Virat Kohli Will Getting Married This December

अनुष्का-विराटचे डिसेंबरमध्ये इटलीत लग्न? पण, प्रवक्ते म्हणाले या सर्व अफवाच

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 18:41 PM IST

चाहत्यांची लाडकी जोडी 'विरुष्का' अर्थातच विरोट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. हे दोघे याच महिन्याच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, येत्या 9, 10 आणि 11 डिसेंबर रोजी दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी त्यांनी इटलीची निवड केल्याचे म्हटले जात आहे. इटलीत दोघांचे विवाह विधी पार पडतील. अनुष्का प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाचीने डिझाइन केलेले वेडिंग ड्रेस परिधान करणार असल्याचे समजते. अलीकडेच अनुष्का आणि विराट झहीर-सागरिका यांच्या लग्नात डान्स करताना दिसले होते.


गुरुवारी इटलीसाठी रवाना होऊ शकतो विराट..
- मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली येत्या गुरुवारी म्हणजे 7 डिसेंबरला इटलीसाठी रवाना होऊ शकतो.
- अनुष्का-विराट यांचे लग्न अतिशय खासगी समारंभ असणार आहे. दोघांनी लग्नासाठी इटलीच्या मिलान शहराची निवड केली असून त्यांच्या कुटुंबीयांनी वेडिंग वेन्यू बुक केले आहे.
- लग्नात अनुष्का आणि विराटच्या कुटुंबीयांसह त्यांची जवळची मित्रमंडळी उपस्थिती लावणार आहे.
- या दोघांच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 21 डिसेंबर रोजी मुंबईत दोघांचे वेडिंग रिसेप्शन होण्याची शक्यता आहे.
- मात्र अनुष्का शर्माच्या प्रवक्त्यांनी या सर्व अफवा असल्याचे पीटीआयशी बोलताना म्हटले आहे.

विराटने घेतली आहे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधून विश्रांती, अनुष्काचीही सुट्टी

10 डिसेंबरपासून होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या एक दिवसीय सिरीजमध्ये विराट सहभाग घेणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 जणांच्या तिसऱ्या टेस्ट टीममध्ये देखील विराट नाही. त्याच्या जागी रोहित शर्मा टीमला लीड करणार आहे. एवढेच नव्हे, तर अनुष्का शर्मा देखील सुट्टीवर जात आहे. विराटने श्रीलंकाविरुद्ध टेस्ट सुरू होण्यापूर्वीच आपल्या सुट्टीचा अर्ज दिला होता. पण विराटचे सुट्टीचे कारण समोर आले नव्हते.

पुढे वाचा, कशी सुरु झाली होती अनुष्का-विराटची लव्ह स्टोरी...

Next Article

Recommended