आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवडील आणि गुरुंसोबत इटलीला रवाना झाली अनुष्का, लग्नाच्या प्रश्नाकडे केले दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, अजय कुमार शर्मा, अनंत धाम आत्माधाम हरिद्वारचे महाराज अनंत बाबा - Divya Marathi
अनुष्का शर्मा, अजय कुमार शर्मा, अनंत धाम आत्माधाम हरिद्वारचे महाराज अनंत बाबा

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीसोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे. इटलीत हे दोघे लग्न करणार आहेत. गुरुवारी रात्री अनुष्का तिच्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी अनुष्का तिचे वडील अजय कुमार शर्मा, आई अशिमा आणि भाऊ कर्णेश शर्मासोबत मोठ्या सुटकेस घेऊन जातना दिसली. इतकेच नाही तर त्यांचे हरिद्वार येथील त्यांचे गुरुसुद्धा त्यांच्यासोबत रवाना झाले आहेत. जेव्हा मीडियाने अनुष्काला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले, तेव्हा तिने प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  9 ते 12 डिसेंबर दरम्यान इटलीमध्ये अनुष्का आणि विराट यांचे लग्न होणार आहे. लग्नाच्या सर्व विधी इटलीत होती. 


गुरु होते सोबत.. 
- इटलीत होणा-या लग्नासाठी अनुष्का हरिद्वारमधील त्यांच्या गुरुंना सोबत घेऊन गेली आहे.
- अनंत धाम आत्माधाम हरिद्वारचे  महाराज अनंत बाबा हे शर्मा कुटुंबांचे गुरु आहेत.
- अनुष्काने मागीलवर्षी विराटसोबत उत्तराखंडमध्ये यांची भेट घेतली होती.  अनुष्का आणि विराट यांच्या रोका सेरेमनीत हे गुरु उपस्थित होते. शर्मा फॅमिलीची महाराज अनंत बाबांवर विषेश श्रद्धा आहे.
- अनुष्का-विराट 2013 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच हे दोघे झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नात एकत्र डान्स करताना दिसले होते.

 

21 डिसेंबर रोजी मुंबईत होणार रिसेप्शन... 

- अनुष्का-विराट यांचे लग्न अतिशय खासगी समारंभ असणार आहे. दोघांनी लग्नासाठी इटलीच्या मिलान शहराची निवड केली असून त्यांच्या कुटुंबीयांनी वेडिंग वेन्यू बुक केले आहे. 
- लग्नात अनुष्का आणि विराटच्या कुटुंबीयांसह त्यांची जवळची मित्रमंडळी उपस्थिती लावणार आहे. 

- या दोघांच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 21 डिसेंबर रोजी मुंबईत दोघांचे वेडिंग रिसेप्शन होण्याची शक्यता आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, मुंबई एअरपोर्टवर क्लिक झालेले अनुष्का आणि तिच्या फॅमिली मेंबर्सचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...