आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'देवसेना\'च्या रुद्रमादेवीतील लूकनेही चाहत्यांना केले होते घायाळ, पाहा तिचे खास PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बाहुबली चित्रपटाने निर्माण केलेल्या अपेक्षांचे ओझे यशस्वीरित्या पेलत सिनेरसिकांच्या मनात कायमचे घर निर्माण करण्याचे काम बाहुबली 2 चित्रपटाने केले आहे. दिग्दर्शक राजामौली यांची कल्पकता, स्पेशल इफेक्ट आणि प्रभास यांची या चित्रपटानंतर चांगलीच चर्चा झाली. पण चित्रपटाच्या यशाची गोळाबेरीज मांडताना देवसेनेची भूमिका वठवणाऱ्या अनुष्काने चित्रपटात प्राण फुंकले असे म्हणणेही वावगे ठरणार नाही.
 
बाहुबली पाहताना एकिकडे युद्ध आणि कौटुंबीक कट कारस्थानांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता, देवसेनेच्या रुपातील अनुष्काला पाहिल्यानंतर कमी होऊन, तिचे रुप मनाला आल्हाद देऊन जाते. या चित्रपटानंतर अनुष्काच्या सौंदर्याच्या प्रेमात पडलेल्यांची संख्या अनेक पटींनी वाढणार यात शंका नाही. पण अशाप्रकारे ऐतिहासिक भूमिका करण्याची अनुष्काची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिने अरुंधती आणि विशेषतः रुद्रमादेवी चित्रपटांत साकारलेल्या भूमिकांनी तिने आपण ऐतिहासिक भूमिका साकारण्यात उत्कृष्ट असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक भूमिकांमध्ये अनुष्काचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असल्याचे याचित्रपटांत पाहायला मिळाले आहे. बाहुबलीतील रुद्रमादेवी साकारतानाही तिचे आरसपाणी सौंदर्य पाहायला मिळाले आहे. त्याचीच झलक आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रुद्रमादेवी चित्रपटातील अनुष्का शेट्टीचे काही LOOKS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...