आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन रामपाल पत्नीपासून विभक्त, लवकरच घटस्फोट होण्याची शक्यता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया)
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर यांच्या घटस्फोटाची पुन्हा एकदा चर्चा होतेय. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनची पत्नी मेहर गेल्या काही दिवसांपासून वकील मृणालिनी देशमुख यांच्या संपर्कात आहे. अर्जुन आणि मेहर सध्या वेगवेगळे राहात असल्याचेही समजते. सहा महिने वेगळे राहून दोघेही घटस्फोटाची पुढील प्रक्रिया सुरु करणार आहेत.
यापूर्वीही या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत होत्या. हृतिक रोशन आणि सुझान रोशन यांच्या घटस्फोटानंतरच अर्जुन आणि मेहर यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. अर्जुन आणि सुझान यांच्यात चांगली मैत्री आहे. आपल्यात सर्वकाही आलबेल असल्याचे अनेकदा अर्जुन आणि मेहर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हे दोघेही दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या लग्नात एकत्र सहभागी झाले होते.
1998 मध्ये झाले होते लग्न
अर्जुन रामपालने 1998 मध्ये माजी मिस वर्ल्ड आणि सुपर मॉडेल मेहर जेसियासोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुली असून माहिरा आणि मायरा ही त्यांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्जुन आणि मेहर यांची निवडक छायाचित्रे...