आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arpita Khan & Aayush Sharmas Romantic Vacation Photos

लग्नाचा पहिला वाढदिवस, कधी न्यूयॉर्क तर कधी लंडन-पेरिसमध्ये फिरले अर्पिता-आयुष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा आज (18 नोव्हेंबर) आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्यावर्षी आयुष शर्मासोबत अर्पिता विवाहबद्ध झाली आणि आता लवकरच आई होणारेय.
हनीमूनसाठी हे कपल न्यूझिलंडच्या प्रसिद्ध बोरा बोरा आयलँडवर गेले होते. मात्र केवळ याच ठिकाणी नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या देशांत या दोघांनी क्वॉलिटी वेळ एकत्र घालवला आहे. गेल्या वर्षभरात अर्पिता आणि आयुष यांनी न्यूयॉर्क, फ्रान्स आणि लंडन या देशांची सफर केली आहे.
सलमानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात हे दोघे काश्मीरमध्येही पोहोचले होते. अर्पिता आपल्या ट्रिप्सची छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. अर्पिता-आयुषच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com तुम्हाला या दोघांच्या वेकेशन्सची निवडक छायाचित्रे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्पिता-आयुषचे रोमँटिक क्षण...