आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन बहू ऐश्वर्या आहे सासू जयाची लाडकी, बघा सासू-सुनेची स्ट्राँग बाँडिंग दाखवणारे PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्याचे प्रसारण छोट्या पडद्यावर झाले. गेल्यावर्षी 19 डिसेंबर रोजी हा अवॉर्ड सोहळा मुंबईत पार पडला होता. या अवॉर्ड सोहळ्यातील सासरे अमिताभ बच्चन आणि सासू जया बच्चन यांच्यासोबतचे ऐश्वर्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी ऐश्वर्याआणि तिच्या सासूबाई जया बच्चन यांच्यातील स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळाली. या अवॉर्ड शोमध्ये ऐश्वर्या तिच्या सासूबाईंसह कॅमे-यात कैद झाली. ऐश्वर्याने तिच्या सासू म्हणजेच जया बच्चन यांच्या खांद्यावर डोकं ठेवलेले दिसते. जणू काही आपल्या आईच्याच खांद्यावर डोकं ठेवल्यासारखे ऐश्वर्याच्या चेह-यावरून दिसते. इतकेच नाही तर मंचावर अवॉर्ड स्वीकारल्यानंतर ऐश्वर्या तिच्या सास-यांच्या पाया पडतानाही दिसली. 
 
अभिषेकने होस्ट केला शो...
स्टार डस्ट अवॉर्ड सोहळ्याचा अभिषेक बच्चन होस्ट होता. ऐ दिल है मुश्किल या सिनेमासाठी ऐश्वर्यासाठी पुरस्कार मिळाला. ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्यानंतर एका प्रेमळ पतीप्रमाणे अभिषेकही तिचे अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावला. स्टेजवर आपल्या पत्नीला मिठी मारून त्याने तिचे अभिनंदन केले.

नऊ वर्षांपूर्वी बच्चन घराण्याची सून झाली ऐश्वर्या... 
बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिचे 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न झाले. लग्नाला जवळपास 9 वर्ष उलटल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकमधील नाते एकदम घट्ट तर झाले आहेच. पण, अमिताभ आणि जया या तिच्या सासू–सास-यांचीही ती लाडकी सून झाली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्यात क्लिक झालेले बच्चन कुटुंबीयांचे खास PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...