आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरच्या काकांवर जडला होता या अॅक्ट्रेसचा जीव, 'या' कारणामुळे होऊ शकले नाही मिलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (02 ऑक्टोबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या आशा पारेख यांच्या नावावर अनेक हीट सिनेमे जमा आहेत. करिअरमध्ये त्यांनी यशोशिखर गाठले. पण खासगी आयुष्यात मात्र एकट्याच राहिल्या. त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही. आशा पारेख यांच्या आयुष्यात एकमेव पुरुषाची एन्ट्री झाली. पण त्यांच्यासोबत त्यांना लग्न करता आले नाही. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचे काका आणि निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर आशा पारेख यांचा जीव जडला होता. दोघांचे बरेच काळ अफेअर होते. पण कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. त्याकाळी नासिर साहेब विवाहित होते. आता नासिर हुसैन हे या जगात नाहीत.

आशा पारेख यांनी दिली होती प्रेमाची कबुली... 
आशा पारेख यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, "होय, नासिर साहेब हे माझ्या आयुष्यात आलेले पहिले आणि शेवटचे पुरुष होते. त्यांच्यावर माझे खूप प्रेम होते. पण मला कधीही त्यांचे घर तोडायचे नव्हते. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबात कधीच मतभेद झाले नाहीत. मला कधीच त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून विभक्त करायचे नव्हते. याच भीतीमुळे मी कधी त्यांच्यासोबत लग्न केले नाही."

आशा पुढे म्हणाल्या होत्या, "माझे लग्न व्हावे, ही माझ्या आईची इच्छा होती. त्याकाळी त्यांनी माझे लग्न व्हावे, म्हणून प्रयत्नदेखील केले होते. पण मला माझ्या आवडीच्या व्यक्तीसोबतच लग्न करायचे होते. तसे होऊ शकले नाही, म्हणून मी आयुष्यभर लग्नच केले नाही."  

आशा पारेख यांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. दिग्दर्शक बिमल रॉय यांनी एका कार्यक्रमात आशा यांना नृत्य करताना पाहिले होते. तेथेच त्यांनी आशा पारेख यांना सिनेमाची ऑफर दिसली होती. 1952 साली आलेल्या मां या चित्रपटातून त्यांनी सिल्व्हर स्क्रिनवर पाऊल ठेवले होते. त्यानंतर 1954 साली आशा पारेख यांचा बाप बेटी हा चित्रपट रिलीज झाला होता. बालकलाकाराच्या रुपात काही चित्रपट केल्यानंतर आशा पारेख यांनी अभिनय सोडून शाळा आणि अभ्यासाकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी पुन्हा अभिनयात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.  

पुढील स्लाईड्सवर वाचा, आशा पारेख यांच्याशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...  
बातम्या आणखी आहेत...